Coldplay Ahmedabad Concert: 'कोल्डप्ले' चं भारतीयांना प्रजासत्ताक दिनाचं खास गिफ्ट; Disney+ Hotstar वर होणार 26 जानेवारीच्या शो चं लाईव्ह स्ट्रिमिंग

2016 च्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल नंतर आता कोल्डप्ले भारतामध्ये पहिल्यांदाच आले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही या कॉन्सर्ट बद्दल विशेष उत्सुकता आहे.

British rock band Coldplay | Instagram

ब्रिटीश रॉक बॅन्ड कोल्डप्ले (Coldplay) मुंबई मधील कॉन्सर्ट साठी भारतात दाखल झाला आहे. मुंबई मध्ये 18,19 आणि 21 जानेवारी नंतर कोल्डप्ले अहमदाबाद (Ahmedabad) मध्ये दोन शो करणार आहेत. यामधील 26 जानेवारीच्या शो चं लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. कोल्डप्ले बॅन्ड करूनच याची अधिकृत घोषणा होणार आहे. Disney+ Hotstar वर भारतीयांना शो घरबसल्या पाहता येणार आहे. मुंबईचे तिन्ही शो नेरूळच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियम वर होणार आहेत.

कोल्डप्ले चे अहमदाबाद मधील दोन्ही शो हे Narendra Modi Stadium वर होणार आहेत. 25 आणि 26 जानेवारी हे शो होणार आहेत. कालच मुंबई मध्ये Chris Martin त्याची गर्लफ्रेंड Dakota Johnson सोबत दाखल झाला आहे. त्याने मरिन ड्राईव्ह वरील रात्री फेर फटका मारल्याचा फोटो पोस्ट केला आहे. नक्की वाचा: Coldplay Announces Retirement: चाहत्यांना धक्का! ब्रिटनचा प्रसिद्ध रॉक बँड 'कोल्डप्ले'ने केली निवृत्तीची घोषणा, 12 व्या अल्बमनंतर थांबवणार काम .

कोल्डप्ले चा अहमदाबाद चा शो होणार लाईव्ह स्ट्रिम

 

View this post on Instagram

 

A post shared by Coldplay (@coldplay)

मागील आठवड्याच्या सुरुवातीला, कोल्डप्ले अहमदाबाद कॉन्सर्टची अतिरिक्त तिकिटे खुली करण्यात आली होती. इतर स्लॉट्सप्रमाणे, BookMyShow वर काही मिनिटांत अतिरिक्त तिकिटे विकली गेली. 2016 च्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल नंतर आता कोल्डप्ले भारतामध्ये पहिल्यांदाच आले आहेत.

Coldplay या ब्रिटीश रॉक बॅन्ड मध्ये  Chris Martin हा  vocalist आणि  pianist आहे.  Jonny Buckland हा गिटारिस्ट आहे.  Guy Berryman हा  bassist आणि  Will Champion हा  drummer आणि percussionist आहे.  Phil Harvey हा बॅन्डचा मॅनेजर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now