अमृता फडणवीस यांच्या आवाजातील 'तेरी बन जाऊंगी' गाणं T- Series तर्फे प्रदर्शित, अवघ्या काहीच तासात 4 लाखाहून अधिक व्ह्यूज (Watch Video)

अवघ्या काहीच तासात 4 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Amruta Fadnavis Teri Ban Jaungoi Song (Photo Credits: YouTube)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis ) या आपल्या गायन कौशल्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. कधी चॅरिटी शो मध्ये तरी कधी सिनेमाच्या निमित्ताने अमृता आपली गाण्याची आवड जपत असतात. त्यांच्या आवाजासोबतच हटके आणि ग्लॅमर्स अंदाजही तितकाच चर्चेचा विषय ठरतो याचेच एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. कबीर सिंग (Kabir Singh) या सुपरहिट सिनेमातील तेरा बन जाऊंगा (Tera Ban Jaunga) या गाण्याचे फिमेल व्हर्जन 'तेरी बन जाऊंगी हे गाणं अमृता फडणवीस यांच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आले आहे. Friendship Day 2019: मैत्रीदिनी अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र फडणवीस यांना हटके अंदाजात शुभेच्छा

टी- सिरीज (T-Series) तर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याचा एक ट्रेलर 3 ऑगस्टला पाहायला मिळाला होता. या गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ आज म्हणजेच 5 ऑगस्ट ला प्रदर्शित झाला असून काहीच वेळात या व्हिडिओवर 4 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

कबीर सिंग सिनेमातील सर्वच गाणी बरीच फेमस झाली आहेत, त्यामुळेच आता बेखयाली आणि मेरे सोनेया गाण्यानंतर तेरी बन जाऊंगी हे गाणे सुद्धा अनप्लगड स्वरूपात बनवले आहे. या गाण्याचे मूळ गायक तुलसी कुमार आणि अखिल सचदेवा हे असून होते. नव्याने आलेल्या या व्हिडीओ व्हर्जन मध्ये अमृता फडणवीस यांच्या एकटीच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. यासंदर्भात अमृता यांनी प्रतिक्रिया देत आपल्याला जेव्हा कबीर सिंग मधील कोणत्याही गाण्याचे फिमेल व्हर्जन गाण्यासाठी पहिल्यांदा विचारण्यात आले तेव्हाच आपण तेरा बन जाऊंगा हे गाणे निवडल्याचे सांगितले. तसेच या गाण्याचे संगीत आणि मूळ गायांकाचे देखील अमृता यांनी कौतुक केले.

 अमृता फडणवीस यांच्या आवाजात 'तेरी बन जाऊंगी'

दरम्यान याआधीही टी सिरीजने अमृता यांच्या काही गाण्यांची निर्मिती केली होती. टी सिरीजच्या MixTape Season 2 मध्ये अमृता फडणवीस आणि बी. प्राक (B Praak) यांना गाण्याची संधी देण्यात आली होती. तर दोन वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेले ‘फिर से’ गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला होता.