Chhaava vs Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित दोन चित्रपट लागोपाठ होतायत प्रदर्शित; विक्की कौशलचे होणार नुकसान?

बॉक्स ऑफिसवर नेहमीच चित्रपटांच्या कमाईची टफ फाईट पहायला मिळते. त्याचेच एक उदाहरण आत विक्की कौशलचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'छावा' सोबत पहायला मिळणार आहे. कारण त्याच वेळी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज रिलीज होणार आहे.

Chhaava vs Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित दोन चित्रपट लागोपाठ होतायत प्रदर्शित; विक्की कौशलचे होणार नुकसान?
Photo Credit- X

Chhaava vs Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) आगामी 'छावा' (Chhaava) चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सूक आहेत. मात्र, छावाच्या प्रदर्शनापूर्वीच मोठे आव्हान पहायला मिळताना दिसते. ‘छावा’ चित्रपटापूर्वी संभाजी महाराजांवर आधारित ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ (Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj)हा आणखी एक चित्रपट येणार आहे. अशा स्थितीत 'छावा'साठी हे मोठे आव्हान ठरू शकते. (Chhaava Teaser: अभिनेता Vicky Kaushal च्या दमदार अंदाजातील 'छावा' चा टीझर जारी; छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित बॉलिवूड सिनेमा)

'धर्म रक्षक महावीर संभाजी महाराज'

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 6 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. तर 'धर्म रक्षक महावीर संभाजी महाराज' हा चित्रपट 22 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. आता एवढ्या कमी वेळात दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने सहाजीकच त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो.

12 नोव्हेंबरला ट्रेलर रिलीज झाला

‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ चित्रपटाचा ट्रेलर काल म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच मराठी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट विकी कौशलच्या चित्रपटाआधी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तर त्याचा थेट परिणाम विकीच्या चित्रपटावर होण्याची शक्यता असून ‘छावा’साठीही ते मोठे आव्हान ठरू शकते.

चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपट 22 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता ठाकूर अनुप सिंग मुख्य भूमिकेत आहे. तो 'महाभारत' आणि 'कमांडो 2' चित्रपटासह अनेक टीव्ही शोमध्ये दिसला होता.

'छावा' प्रभावित होऊ शकतो

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनला असला तरी ‘छावा’पूर्वी प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. आता दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच बॉक्स ऑफिसवर त्यांनी कशी कामगिरी दाखवली हे कळेल.

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2024 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).