Chethana Raj Dies: 'फॅट फ्री' सर्जरी केल्यानंतर अभिनेत्री चेतना राजचे निधन

अभिनेत्री चेतना राज हिची ‘फॅट फ्री सर्जरी’ मुळे बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

Chethana Raj Dies: 'फॅट फ्री' सर्जरी केल्यानंतर अभिनेत्री चेतना राजचे निधन

अभिनेत्री चेतना राज हिची ‘फॅट फ्री सर्जरी’ मुळे बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. TOI च्या वृत्तानुसार, 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीला काल सकाळी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर   फुफ्फुसात पाणी शिरल्यानं संध्याकाळी तिची तब्येत खालावली. तिला श्वास घेण्यात देखील त्रास जाणवू लागला. अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांना न सांगता रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा चेतनाच्या पालकांनी केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2022 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).