Yoga Day 2023: बॉलिवूड हिट अँड फिट, Bipasha Basu, Malaika Arora ते Kareena Kapoor यांचा योगा, अर्थातच बोल्डनेसचा तडका (See Photo)
मलायका अरोरा (Malaika Arora), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि बिपाशा बसू ( Bipasha Basu) यांसारख्या अभिनेत्रिंचा समावेश आहे. या अभिनेत्रिंनी आपल्या योगासने करत आपल्या हॉटनेसचा तडका दाखवला आहे. आपणही हे फोटो आणि व्हिडिओ येथे पाहू शकता.
भारत आणि अवघे जग आज आंतरराष्ट्रीय योग दिन (International Day of Yoga 2023) साजरा करत आहे. सहाजिकच योग आणि तंदुरुस्ती यांचे नाते अधिक घट्ट. जेव्हा तंदुरुस्तीचा विषय येतो तेव्हा बॉलिवूडचा उल्लेख नाही जाला तरच नवल. क्रीडाविश्व सोडले तर बॉलिवूड (Bollywood ) एकमेव क्षेत्र असावे ज्यात फिटनेस म्हणजेच तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा फिटनेसचा विषय येतो तेव्हा बॉलिवडून आघाडीवर दिसते. आजही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात प्रामुख्याने मलायका अरोरा (Malaika Arora), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि बिपाशा बसू ( Bipasha Basu) यांसारख्या अभिनेत्रिंचा समावेश आहे. या अभिनेत्रिंनी आपल्या योगासने करत आपल्या हॉटनेसचा तडका दाखवला आहे. आपणही हे फोटो आणि व्हिडिओ येथे पाहू शकता.
मलायका अरोरा (Malaika Arora)
मलायका अरोरा आणि तंदुरुस्ती हे समिकरणच. मलायका अरोरा यांचे वय आणि त्यांनी जपलेली प्रकृती अनेकांसाठी कौतुकाचा विषय. आजही योग दिनानमित्त मलायका यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उल्लेखनीय असे की, मलायका अरोरा यांचे मुंबई येथे दिवा योग केंद्र नावाचा स्वतःचा योगा स्टुडिओ (Diva Yoga centre in Mumbai) आहे. (हेही वचाा, Yoga Day 2023: 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 'वसुधैव कुटुम्बकम' थीमवर देशभर उत्साह; CM Eknath Shinde ते राज्यपाल रमेश बैस यांनीही केला योगाभ्यास)
व्हिडिओ
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तर खास तिच्या योगा आणि तंदुरुस्ती यामुळेच अधिक लोकप्रिय आहे. ती अभिनेत्री आहेच. परंतू, त्यासोबत ती एक योगा तज्ज्ञही आहे. योगाची आणि आसनांची माहिती देणारे विविध व्हिडीओही तिने लॉन्च केले आहेत. प्राप्त माहितीनुसार तिने स्वतःचे योग वेलनेस चॅनल देखील लॉन्च केले आहे.
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)
करीना कपूर अर्थातच बॉलिवूडची बेबो फिटनेससाठी विशेष प्रसिद्ध आहे. मध्यंतरी आलेल्या एका चित्रपटात तिने मेंटेन केलेली झिरो फीगर ही अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरली होती. फिटनेस राखण्यासाठी आजही ती योगालाच विशेष महत्तव देते.
बिपाशा बसू ( Bipasha Basu)
बिपाशा बसू ही सुद्धा फिटनेसप्रेमी आणि योगाची उत्कट अभ्यासक आहे. तिने योगा वर्कआउट्सच्या स्वतःच्या फिटनेस डीव्हीडी जारी केल्या आहेत. बिपाशा बसूचा असा विश्वास आहे की योगा तिला फक्त तंदुरुस्त राहण्यास मदत करत नाही तर तिच्या मानसिक शांती आणि भावनिक कल्याणासाठी देखील योगदान देते. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये ती अनेकदा तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत योगा करताना दिसते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)