लग्नानंतर Yami Gautam ने शेअर केले मेहंदीचे Photos

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम दिग्दर्शक आदित्य धर सोबत विवाहबंधनात अडकली. यामी आणि आदित्यने आपल्या कुटुंबियांसमवेत कोणताही बोलबाला न करता गुपचूप लग्नगाठ बांधली. काल लग्नाचे फोटोज शेअर केल्यानंतर यामीने आज मेहंदीचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

लग्नानंतर Yami Gautam ने शेअर केले मेहंदीचे Photos
Yami Gautam Mehndi Photos (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) सोबत विवाहबंधनात अडकली. यामी आणि आदित्यने आपल्या कुटुंबियांसमवेत कोणताही बोलबाला न करता गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यानंतर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी यामी-आदित्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काल लग्नाचे फोटोज शेअर केल्यानंतर यामीने आज मेहंदीचे फोटोज (Mehndi Photos) सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात यामीसोबत आदित्य देखील दिसत आहे.

या फोटोत यामीने नारंगी रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला असून आदित्यने निळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. यामीच्या हातावरील मेहंदी सुरेख आहे. यात दोघेही अगदी आनंदात दिसत आहेत. या फोटोंना सुमारे 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकजण कमेंट करुन आपली पसंती दर्शवत आहेत.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

लग्नातील या फोटोवर कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, ताहिरा कश्यप अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या होत्या. (Yami Gautam आणि दिग्दर्शक Aditya Dhar यांनी गुपचुप लग्न केल्याचे कळल्यानंतर बॉलिवूडकरांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

यामीची लग्नाची घोषणा हा तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. दरम्यान, यामीने आदित्य धर याच्या उरी: द सर्जिकल स्ट्राइक सिनेमात काम केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2021 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).