Yahoo 2021 Year In Review: सिद्धार्थ शुक्ला ठरला 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केलेला सेलिब्रिटी; करीना कपूर, आर्यन खान, राज कुंद्रा यांचाही समवेश (See List)
विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे, तर क्रिकेटर एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा तिसऱ्या क्रमांकावर होता
2021 वर्ष संपून 2022 चे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यासह याहू (Yahoo) ने भारतासाठी त्यांची '2021 वर्षातील इयर इन रिव्ह्यू’ यादी जारी केली आहे. त्यानुसार यंदा ‘शेतकरी आंदोलन’ अव्वल 'न्यूजमेकर' ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. सिद्धार्थ शुक्ला हा या वर्षी सर्वाधिक सर्च केला गेलेला भारतीय सेलिब्रिटी आहे, ज्याचे 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
या यादीत सलमान खान दुसऱ्या तर तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुनीत राजकुमार चौथ्या स्थानावर आहे, ज्याचे 29 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पाचवे स्थान मिळाले आहे. दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याहूच्या या यादीनुसार किसान आंदोलनाला टॉप न्यूजमेकर श्रेणीत पहिले स्थान मिळाले आहे.
मुंबईतील क्रूझ जहाजावर एनसीबीच्या छापेमारीनंतर अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला या श्रेणीत दुसरे स्थान मिळाले आहे. आर्यन हा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आहे. यामध्ये तिसरे स्थान 2121 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला मिळाले आहे. चौथ्या स्थानावर अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात अडकलेला राज कुंद्रा (अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती) आणि पाचव्या स्थानावर ब्लॅक फंगस रोग आहे.
करीना कपूर खानने यावर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या वर्षी तिने 'द प्रेग्नन्सी बायबल' या पुस्तकाचे प्रकाशन करून एक लेखिका म्हणून तिची उपस्थिती जाणवून दिली. ती 2021 मध्ये भारतातील सर्वाधिक शोधलेली महिला सेलिब्रिटी आहे. 'सूर्यवंशी'च्या यशामुळे आणि लग्नाच्या बातम्यांमुळे कतरिना कैफ नंबर 2 वर आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास (क्रमांक 3), आलिया भट्ट (क्रमांक 4) आणि दीपिका पदुकोण (क्रमांक 5) या भारतातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या महिला सेलिब्रिटींमध्ये होत्या. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असलेली समंथा रुथ प्रभू यंदाच्या यादीत दहाव्या क्रमांकावर होती. (हेही वाचा: इस्रायलचे Tev Aviv ठरले जगातील सर्वात महागडे शहर; स्वस्त शहरांच्या यादीत भारताच्या Ahmedabad चा समावेश (See List)
यंदाच्या यादीत क्रिकेटपटू आणि ऑलिम्पिक स्टार्सचा दबदबा दिसून आला. विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे, तर क्रिकेटर एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा तिसऱ्या क्रमांकावर होता. सचिन तेंडुलकर चौथ्या, रोहित शर्मा पाचव्या, ऋषभ पंत आठव्या आणि केएल राहुल 10 व्या क्रमांकावर होता.