Nawazuddin Siddiqui चित्रपटात काम करणं सोडणार? मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने व्यक्त केली संन्यासी बनण्याची इच्छा

या चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित एका मुलाखतीत नवाजने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे.

Nawazuddin Siddiqui (PC - Facebook)

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक महिन्यांपासून त्याचा आपल्या एक्स पत्नीशी जोरदार वाद सुरू आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. मात्र, आता दोघांनीही तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नवाजुद्दीनची नुकतीच मुलाखत खूप चर्चेत आली आहे. या मुलाखतीत नवाजने तो कोणत्या मानसिक अवस्थेतून जात आहे हे उघड केले आहे. मीडियाशी बोलताना नवाझने संन्यासी बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एक दिवशी कोणालाही न सांगता अचानक गायब होणार असल्याचंही अभिनेत्याने मुलाखतीदरम्यान बोलताना म्हटलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित एका मुलाखतीत नवाजने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. इंडिया टीव्हीशी बोलताना तो म्हणाला की, 'माणूस आयुष्यभर स्वत:ला वाचवतो, तो इतरांना न्याय देतो. मला साधू व्हायचे आहे. मी अभिनेता नसतो तर भिक्षू झालो असतो'. (हेही वाचा - Adipurush Trailer: प्रभासच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली! या दिवशी 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर होणार प्रदर्शित)

निवृत्तीकडे वाटचाल करत असल्याचे संकेत देत नवाज म्हणाला की, 'मी अचानक गायब होऊ शकतो. तुम्हाला ती बातमी आल्यावरच कळेल. मला शांत ठिकाणी बसून चिंतन करायला आवडते. मी लिहित नाही, फक्त करतो. माझ्या अनुभवाचा काही भाग उपयोगी पडला तर मला खूप धन्य वाटेल. तो पुढे म्हणाले की, 'मी माझ्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी उपाय केले आहेत. पण मोठ्या गोष्टी मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही. इथे फक्त प्रामाणिकपणा आणि मेहनत आहे.'

नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच नेहा शर्मासोबत 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटात दिसणार आहे. दोघेही एकत्र चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दिग्दर्शक कुशन नंदी यांचा हा चित्रपट 12 मे 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif