लवकरच Aamir Khan अडकणार तिसऱ्या विवाहबंधनात? आपल्या को-स्टारसोबतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, जाणून घ्या सविस्तर

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाआधी आमिर खान आणि फातिमा सना शेख रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. यामुळेच त्याने किरण रावशी घटस्फोट घेतल्याचेही काहींनी सांगितले. फातिमा आमिर खानसोबत 'दंगल' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात दिसली होती

आमिर खान (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाकडे लागल्या आहेत, जे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. पण आता बातमी येत आहे की, आमिर खानही (Aamir Khan) तिसरे लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खानने पत्नी किरण रावपासून अचानक घटस्फोट घेतला आहे. आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत असून अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

सोशल मिडियावर असा दावा केला जात आहे की, आमिर खान त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' रिलीज झाल्यानंतर लग्नाची घोषणा करेल. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलमध्ये आमिर चाहत्यांना त्याच्या लग्नाची माहिती देऊ शकतो, असे मानले जात आहे. इतकेच नाही तर ज्या बातम्या व्हायरल होत आहेत, त्यानुसार आमिर खान त्याच्या एका को-स्टारसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाआधी आमिर खान आणि फातिमा सना शेख रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. यामुळेच त्याने किरण रावशी घटस्फोट घेतल्याचेही काहींनी सांगितले. फातिमा आमिर खानसोबत 'दंगल' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात दिसली होती. मात्र, हळूहळू ही अफवा शांत होत गेली. आता आमिरच्या तिसऱ्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, आमिरचे लग्न नक्की कोणासोबत होणार आहे. (हेही वाचा: TMKOC: तारक मेहता...च्या ‘रीटा रिपोर्टर’ने केले दुसरं लग्न, पाहा फोटो)

परंतु अजूनतरी याबाबत काही ठोस माहिती समोर आली नाही. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिरचे त्याच्या को-स्टारसोबत अफेअर असल्याच्या बातमीने त्यांच्या लग्नाच्या अफवांना उधाण आले आहे. दरम्यान, आमिर खानने आतापर्यंत दोन लग्न केले आहेत. 1987 मध्ये अभिनेत्याने रीना दत्तासोबत पहिले लग्न केले. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले. परंतु या दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही. आमिर खानला इरा खान, जुनैद खान आणि आझाद राव खान अशी तीन मुले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement