Who is Marina Kuwar? जाणून घ्या कोण आहे मरीना कुंवर? जिचं नाव घेत सोनू निगमने भूषण कुमार ला दिली एक्सपोज करण्याची धमकी

त्यानंतर सोनूने आज पुन्हा नवीन व्हिडिओ शेअर करत टी-सिरिजचा (T-Series)सर्वेसर्वा भूषण कुमार (Bhushan Kumar) याला इशारा दिला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगमने भूषण कुमारला 'माझ्या नादी लागलास तर, मरीना कुंवरचा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर पब्लिश करील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वांनाचं मरीना कुंवर (Marina Kuwar) च्या प्रकरणाविषयी उत्सुकता लागली आहे. चला तर मग या बातमीच्या माध्यमातून मरीना कुंवरसंदर्भात काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

Marina Kuwar (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने म्यूझिक इंडस्ट्रीतील काही धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर सोनूने आज पुन्हा नवीन व्हिडिओ शेअर करत टी-सिरिजचा (T-Series)सर्वेसर्वा भूषण कुमार (Bhushan Kumar) याला इशारा दिला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगमने भूषण कुमारला 'माझ्या नादी लागलास तर, मरीना कुंवरचा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर पब्लिश करील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वांनाचं मरीना कुंवर (Marina Kuwar) च्या प्रकरणाविषयी उत्सुकता लागली आहे. चला तर मग या बातमीच्या माध्यमातून मरीना कुंवरसंदर्भात काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

मरीना कुंवर ही एक मॉडेल टिव्ही अभिनेत्री आहे. मरीनाने 'जिंदगी तुमसे', 'जग्‍गू दादा', 'शपथ', 'सीआईडी' आणि 'आहट' आदी मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 2018 मध्ये मरीना कुंवरने न‍िर्देशक साजिद खान आणि भूषण कुमारवर शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी मरीना कुंवरने #MeToo अभियाना अंतर्गातील एका मुलाखतील भूषण कुमारसंदर्भात मोठा खुलासा केला होता. भूषण कुंवरने मला व्हिडिओमध्ये काम देण्याची ऑफर देत घरी बोलावलं होतं आणि माझ्याबरोबर चुकीचं वर्तन केलं होतं, असंही मरीनाने या मुलाखतीत सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

I love kids; I think they are fun and funny. Love you Havish ❤️🥰❤️ #kidsofinstagram #kidsactivities #funnykidsvideo #kid

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

 

View this post on Instagram

 

I am watching all the episodes of #MujhseShaadiKaroge on @colorstv I am loving ❤ this show and it's concept 😍 Best wishes to my friend @mayurverma Hope he wins the show ✌ @colorsTV @justvoot #EndemolShineIndia

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

मरीनाचा एक मॉडेल तर अभिनेत्री असा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. परंतु, तिने कधीही हार मानली नाही. 2017 मध्ये मरीना अक्षय कुमार सोबत ‘मिलियन डॉलर बेबी’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार होती. त्यावेळी मरीनाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं होत की, 'अक्षय कुमारसारख्या स्टारबरोबर काम करणे, हे माझं स्वप्न होतं. माझा मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. परंतु, मी कधीही हार मानली नाही आणि मला विश्वास आहे की, मला चित्रपटसृष्टीत लवकरचं नवी ओळख भेटले.'

 

View this post on Instagram

 

I’ve learned that anything in life worth having comes from patience and hard work. #hard #work #keeptrying 🙏

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

दरम्यान, 2016 मध्ये मरीना आणि टीव्ही अभिनेता मयूर वर्मा यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर बिग बॉस 9 मध्ये या दोघांना संपर्क साधण्यात आला होता. सोनू निगम यांच्या भूषण कुमार संदर्भातील खुलाशानंतर सध्या सोशल मीडियावर मरीना कुंवरचं नाव ट्रेडिंग होतं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif