Shah Rukh Khan: शाहरुख खान अभिनयातून कधी निवृत्ती घेणार? चाहत्यांच्या प्रश्नावर किंग खानने केला खुलासा

चित्रपटाच्या विक्रमी यशादरम्यान किंग खानने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना अनोखे उत्तर दिले आहे.

Shah Rukh Khan (PC - Facebook)

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याच्या चित्रपटाने 26 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातही या चित्रपटाच्या कलेक्शनने विक्रमी कामगिरी केली आहे. चित्रपटाच्या विक्रमी यशादरम्यान किंग खानने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना अनोखे उत्तर दिले आहे.

शाहरुख खानने सोमवारी आस्क एसआरके (#AskSRK) सत्र आयोजित केले होते. या सत्रात चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. काहींनी गंभीर प्रश्न विचारले, तर काहींनी किंग खानला विनोदी पद्धतीने प्रश्न केला. शाहरुखनेही त्याच्या चाहत्यांना त्याच मूडनुसार उत्तर दिले. अभिनयातून निवृत्तीबाबतही त्यांनी उत्तर दिले. (हेही वाचा -Pathaan Creates History: शाहरुख खानच्या 'पठाण'ने रचला इतिहास; Bahubali 2 ला मागे टाकून ठरला सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट)

एका चाहत्याने विचारले, तुला पाळीव प्राणी आवडतात का? तुमच्याकडे एकच पेट्स का नाही? याला उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, माझ्याकडे अनेक पाळीव प्राणी आहेत. मी फक्त त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही. कारण, त्यांनी माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध व्हावं, असे मला वाटत नाही.

अभिनयातून निवृत्ती कधी घेणार?

आस्क एसआरके सेशनमध्ये, दुसऱ्या एका चाहत्याने त्याला विचारले की त्याच्यानंतर बॉलीवूडमधील पुढचा मोठा सुपरस्टार कोण असेल? याला प्रत्युत्तर देताना शाहरुखने सांगितले की, तो कधीही निवृत्त होणार नाही आणि मी कधीही निवृत्ती घेणार नाही. मला काढून टाकले जाऊ शकते. पण त्यानंतरही मी अधिक फिट होऊन बाहेर येईन.

एका चाहत्यांने शाहरुखला त्याची सर्वात वाईट सवय कोणती? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला खुलासा करताना शाहरुखने सांगितले की, मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याची सवय आहे. तीच तीच गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगत राहतो.

शाहरुखच्या 'पठाण'नंतर या वर्षी जवान आणि डंकी हे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'जवान' जूनमध्ये तर 'डँकी' डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. दोन्ही बिग बजेट चित्रपट आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif