West Bengal Elections: कंगना रनौत विरोधात कोलकाता मध्ये तक्रार दाखल, मतमोजणीवेळी केले 'हे' ट्विट्स
त्यामध्ये एनआरसी (NRC), सीएए (CAA) ते रोहिंग्यासह अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता.
West Bengal Elections: पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या वेळी अभिनेत्री कंगना रनौत हिने काही ट्विट्स केले होते. त्यामध्ये एनआरसी (NRC), सीएए (CAA) ते रोहिंग्यासह अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. या संबंधितच एका वकिलाने कंगनाच्या विरोधात कोलकाता पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. वकीलने आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, कंगना बंगालमध्ये कायदेव्यवस्था बिघडवू पाहत आहे. तर मुंबईत राहणारी आणि पेशाने सिल्विर स्क्रिन अभिनेत्री आहे. परंतु तिच्या ट्विटरवर बंगाल निवडणूकीबद्दलच अधिक बोलले गेले आहे.
आरोप असा आहे की, रविवारी बंगालमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर मजमोजणी सुरु झाल्यानंतर कंगना हिने काही ट्विट्स केले. त्यामध्ये बंगालची तुलना कश्मीर सोबत करण्यात आली. ममता बॅनर्जी यांना रावणाची उपमा देत त्यांची थट्टा केली. तर तृणमूल पक्ष विजयी झाल्यानंतर तिसऱ्यांदा आता सत्ता स्थापन करणार आहे. कंगनीने या बद्दल सुद्धा काही ट्विट केले आहेत. तिने ट्विटमध्ये असे म्हटले की, बांग्लादेशी आणि रोहिंग्या ममता बॅनर्जींची खरी ताकद आहे. आकडेवारीनुसार, बंगालमध्ये आता हिंदू बहुसंख्येने नाही आहेत. बंगाली मुस्लिम भारतात सर्वाधिक गरीब आहेत. बंगालला एक आणखी कश्मीर बनवला जात आहे. कंगना ऐवढे बोलून थांबली नाही.(West Bengal: नंदीग्राम येथील भाजपच्या ऑफिसवर अज्ञातांकडून हल्ला, तोडफोड करण्यासह आग लावण्याचा प्रयत्न)
Tweet:
कंगनाने पुढे एक ट्विट करत तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आरामबाग मध्ये भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्याच्या प्रकारावर एका ट्विटचे उत्तर देत तिने म्हटले की, बंगालमध्ये रक्तपात होणार. कंगनाने त्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये अमित शहा यांना टॅग करत भाजपच्या कार्यकर्त्यांचा बचाव करण्याचे अपील केले. ममता यांच्या टीमकडून विजयाची घोषणा केल्यानंतर त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. पण त्यात सुद्धा खडे बोल ऐकवल्याचे दिसून आले.
Tweet:
ममता बॅनर्जी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर या विधानसभा निवडणूकीत एका वाघिणीसारख्या लढल्या आहेत. गृहमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा उतरण्यास परवानगी दिली नव्हती. सीएए, एनआरसी थांबले गेलेय. पीएम मोदी यांच्यासोबत खेळाबद्दल बोलतात. अगदी खुल्या स्वरुपात शरणार्थ्यांना शरण दिले जात असून त्यांना मतदान कार्ड दिले. लोकशाहीची येथे थट्टा आहे. तरीसुद्धा ममता बॅनर्जी यांना सलाम करते. कारण त्यांना जर खलनायक बनायचे असल्यास त्यांनी ममता यांच्या सारखे बनावे. रावणासारखे लढा. राहुल गांधी यांच्यासारखे नव्हे. ममता यांना जिंकायला हवे. याच ट्विट्स संबंधित तक्रार दाखल करण्यात आली आहे.