Virat Kohli Washing His Spikes: चिखलाने माखलेली चप्पल धुताना दिसला विराट कोहली, पत्नी अनुष्का शर्मा ने पतीच्या नकळत काढला 'हा' फोटो

हे पाहून पत्नी अनुष्का प्रचंज खूश झाली असून दौऱ्यावर जाण्यापूर्वी नवऱ्याला इतकं मन लावून चिखलाने माखलेल्या चप्पल साफ करताना पकडलं आहे, असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे.

Virushka Photo (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही लवकरच आई होण्याच्या उंबरठ्यावर असून ती सध्या आपली प्रेगन्सी लाईफ छान एन्जॉय करताना दिसत आहे. गरोदरपणाचा छान ग्लो देखील तिच्या चेह-यावर आला असून ती पण हे सारे एन्जॉय करतेय हे एकूणच सोशल मिडियावर तिच्या बेबी बंपच्या (Baby Bump) फोटोवरून दिसत आहे. तिची आणि तिच्या पतीची विराट कोहलीची (Virat Kohli) धमालमस्तीचे फोटो देखील ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र नुकताच तिने आपल्या पतीचा विराट कोहली गुपचूप काढलेला एक फोटो तिच्या इन्स्टा स्टेटसला ठेवला आहे. या फोटोमध्ये भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आपल्या चप्पला (Virat Washing His Shoe) धुताना दिसत आहे.

चिखलाने माखलेले विराटच्या चप्पला तो स्वत:च्या हातांनी छान घासून घासून धुवत आहेत. हे पाहून पत्नी अनुष्का प्रचंज खूश झाली असून दौऱ्यावर जाण्यापूर्वी नवऱ्याला इतकं मन लावून चिखलाने माखलेल्या चप्पल साफ करताना पकडलं आहे, असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे.

हेदेखील वाचा- Anushka Sharma to Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर भडकली अनुष्का शर्मा, म्हणाली 'माझे नाव वापरूनच तुमची प्रतिक्रिया पूर्ण होणार होती का?'

Virat Kohli (Photo Credits: Instagram)

लवकरच आई-बाबा होणारे विराट-अनुष्का सध्या सातव्या आसमानात आहे. हे दोघेही बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक असून त्यांचे असंख्या फॅन्स सोशल मिडियावरही आहेत. या दोघांचा असा स्वत:चा चाहतावर्ग असून यांची जोडी देखील प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे त्यांचे चाहते देखील विराट-अनुष्काला मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

अलीकडेच  इंडियन प्रीमिअर लीगच्या निमित्ताने युएई येथे असणाऱ्या विराटने पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) साथीदारांसह युएईतील खासगी बोटवर विराटच्या वाढदिवसाचे जंगी अंदाजात सेलिब्रेशन केलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif