बेबी बंप दिसूनही अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नंट नाही; जाणून घ्या Viral फोटोमागचे सत्य

महत्वाचे म्हणजे या दोन्ही गोष्टी कॅमेऱ्याची कमाल मुळीच नाही. पण, हेही खरे की, छायाचित्रात दिसणारे करीनाचे बेबी बंप खरे असूनही वास्तवात करीना प्रेग्नंट नाही. व्हायरल छायाचित्रांमांगचे वास्तव असे की..

Kareena Kapoor Khan on the sets of Good News (Photo Credits: Yogen Shah)

एकेकाळी आपल्या झीरो फिगरसाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवुड गर्ल बेबो अर्थातच करीना कपूर (Kareena Kapoor) नुकतीच तिच्या काही व्हायरल छायाचित्रांमुळे (Viral Pictures) चर्चेत आली आहे. नुकतीच तीने 'कॉफी विद करन' (Koffee with Karan) शोमध्ये हजेरी लावली होती. आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्यासोबत धमाल उडवून दिली होती. या शोमध्ये तिने दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरे प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरली होती. दरम्यान, करीना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये दिसणारे करीनाचे बेबी बंप (Kareen Kapoor Baby Bump Pictures) हे चर्चेचे प्रमुख कारण आहे. तिची छायाचित्रे समोर येताच कोणतीही प्रतिक्षा न करता थेट मत नोंदवणाऱ्या सोशल मीडियाने करीना प्रेग्नट असल्याचेच थेट जाहीर करुन टाकले. वास्तवात मात्र असे काहीच नसून खरा प्रकार वेगळाच आहे. जो भलताच मनोरंजक आणि मजेशीर आहे.

प्राप्त माहितीनुसार, करीना कपूरची व्हायरल झालेली छायाचित्रं पूर्णपणे खरी आहेत आणि त्यात दिसणारे बेबी बंपही. महत्वाचे म्हणजे या दोन्ही गोष्टी कॅमेऱ्याची कमाल मुळीच नाही. पण, हेही खरे की, छायाचित्रात दिसणारे करीनाचे बेबी बंप खरे असूनही वास्तवात करीना प्रेग्नंट नाही. व्हायरल छायाचित्रांमांगचे वास्तव असे की, ही छायाचित्रं करीनाच्या आगामी चित्रपटातील आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि करीना कपूर हे दोघे 'गुड न्यूज' चित्रपटातून एकत्र झळकत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरुनच कोणीतरी लिक झाली आहेत. ही छायाचित्रे सोशल मीडियावर येताच करीना कपूर प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरु लागल्या.

करीना कपूर आणि अक्षय कुमार हे दोघे प्रदीर्घ काळानंतर पडद्यावर एकत्र येत आहेत. यापूर्वी साबिर खानचा चित्रपट 'कमबख्त इश्क' या चित्रपटातून ही जोडी पडद्यावर आली होती. 'गुड न्यूज' चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाले असून, हा चित्रपट सोरोगसीवर आधारीत असल्याचे समजते. व्हायरल छायाचित्रांमध्ये दिसत असलेला करीनाचा अवतार हा 'गुड न्यूज' चित्रपटातील आहे. (हेही वाचा, शहीद जवानांच्या कुटुंबांना अक्षय कुमारची 5 कोटी मदत; बॉलीवूडच्या या कलाकारांनी दिला मदतीचा हात)

दरम्यान, अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्याशिवाय दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री कियारा आडवाणी हे सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्यूज' हा चित्रपट याच वर्षी 19 जुलै रोजी प्रदर्शित होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif