Vipin Reshammiya Passes Away: संगीतकार Himesh Reshammiya यांना पितृशोक; विपीन रेशमियांचे 87 व्या वर्षी निधन

त्यांनी हिमेश रेशमिया यांचं संगीत क्षेत्रातील करियर घडवण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Vipin Reshammiya | X

ज्येष्ठ संगीतकार विपीन रेशमिया (Vipin Reshammiya) यांचं मुंबई मध्ये निधन झाले आहे. 87 वर्षीय विपीन रेशमिया यांनी 18 सप्टेंबरला अखेरचा श्वास घेतला. दरम्यान विपीन यांचा मुलगा हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) यांचं संगीत क्षेत्रातील करियर घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. लहानपणापासून त्यांनीच हिमेश यांना संगीताचे धडे दिले आहेत. आज 19 सप्टेंबर दिवशी त्यांच्यावर अंत्यसंकार होणार आहेत.

विपीन रेशमिया यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे मुंबईत एका खाजगी हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. जुहूत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. विपीन यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संगीतक्षेत्राप्रमाणे हिमेश रेशमिया यांच्या दोन सिनेमांचे ते निर्माते देखील राहिले आहेत. 1998 साली हिमेश रेशमिया यांचा पहिला संगीतकार म्हणून सिनेमा 'प्यार किया तो डरना क्या' होता. त्याची आठवण सांगताना बाबा विपीन आणि सलमान खान यांच्या मैत्रीतून हिमेशची बॉलिवूड सुपरस्टारशी ओळख झाली. याच संबंधातून हिमेशला पहिला सिनेमा मिळाला.