Chhava Movie Teaser Vicky Kaushal: 'छावा' चित्रपटचा अंगाला काटा आणणारा टीझर रिलीज, Vikcy Kaushal चा लूक पाहून चाहते फिदा
छत्रपती संभाजी महाराजा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनरेषा यात पाहता येणार आहे
Chhava Movie Teaser Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराजा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनरेषा यात पाहता येणार आहे. छावा चित्रपटाचा अंगाला काटा आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच बॉलिवूडचा अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजाची भुमिका साकारणार आहे. (हेही वाचा- हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाठली सेन्चूरी, अभिनेत्री कंगणाने केले टीमचे कौतुक)
चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केली आहे. छावा चित्रपटाचा टीझर पाहून नेटकऱ्यांनी विकी कौशलचे कौतुक केले आहे. त्याचा अॅक्शन लूक हा व्हायरल होत आहे. छावा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. नुकताच, छावा चित्रपटातील विकी कौशलचा त्याचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. चित्रपटत ६ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे.
छावा चित्रपटात मुख्य भुमिकेत रश्मीका मंदना देखील झळकणार आहे. औरंगजेबची भुमिका अक्षय खन्ना साकारणार आहे. दिव्या दत्ता ही सोयराबाईच्या भुमिकेत तर रश्मिका मंदाना आणि नील भूपालम झकणार आहे. प्रेक्षकांनी चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2024 02:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

