Suhana Khan Troll: इंस्टाग्रामवर शेअर केला बाथटबमधील अंघोळ करताचा व्हिडिओ, सुहाना खान नेटकऱ्यांकडून होतेय ट्रोल (Watch Video)
नुकतेच तीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.
Suhana Khan Troll: बॉलिवूडचा किंग खानची मुलगी सुहाना खान सद्या ट्रोल होत आहे. नुकतेच तीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहेत. आपल्या फॅशनमुळे सुहाना नेहमी चर्चेत असते. सिने सृष्टीत पदार्पण केल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.. सोशल मीडियावर सुहाना खानने बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. (हेही वाचा- लॅक्मे फॅशन वीकमधील अभिनेत्रींचे लूक्स चर्चेत; मलायकापासून सारापर्यंत कोणाचा बोलबाला सर्वात जास्त?
सुहाना खानने स्वत:च्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत अंकाऊट वरून बाथटबमधील अंघोळ करताचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुहानाचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच धुमाकुळ घालत आहेत. हा बोल्ड व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी सुहानाला चांगलेच ट्रोल केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ तीनं एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी केला आहे.
व्हिडिओत सुहाना बाथटबमध्ये आहे. तीने चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला आहे. व्हिडिओत तीने निरागस लूक केला आहे. नेटकऱ्यांनी तीला या व्हिडिओ संदर्भात टीका केली आहे. एकाने लिहले आहे की, रमजान सुरु आहे, थोडी तरी लाज बाळग तर दुसऱ्या नेटकऱ्यांने लिहले आहे की, ड्रीम गर्ल. सुहाना खान तिच्या द आर्चीज या सिनेमासाठी चर्चेत आली होती.