National Awards 2023: राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्यावर अल्लू अर्जूनचा घराबाहेर जल्लोष; चाहते जल्लोषात शामिल (Watch Video)
अभिनेता अल्लू अर्जुन याने पुष्पा: द राइज या चित्रपटातील अभिनयासाठी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. त्याने घराबाहेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर घराबाहेर जल्लोष साजरा केला आहे.
National Awards 2023: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याने पुष्पा: द राइज या चित्रपटातील अभिनयासाठी गुरुवारी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. या चित्रपटाने बॉस्क ऑफिसवर भरघोस कमाई केली. पहिल्यांदाच तेलुगु अभिनेत्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्याने त्याच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केल्यानंतर, फटाके फोडून त्याच्या विजयाचा आनंद साजरा केला. चित्रपटाने तेलुगू भाषे,ह हिंदी भाषेत ही कमाई केली आहे.
चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष केल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर 2021 मध्ये पुष्पा मोठ्या पडद्यावर आली आणि त्यात रश्मिका मंदान्ना देखील होती. या चित्रपटाने केवळ त्याच्या अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शनच केले नाही तर संवाद, स्वॅग आणि मनमोहक अदा देखील चित्रित केली आहे. चाहत्यांनी अभिनेता अल्लू अर्जूनच्या घरा बाहेर येवून जल्लोष साजरा केला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
अल्लू अरविंद यांनीही या खास प्रसंगी आपल्या मुलाला मिठी मारून आनंद व्यक्त केला. ‘पुष्पा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमारही यावेळी अल्लू अर्जुनच्या घरी गेले होते. कलाकार मंडळी देखील त्यांच्या भेटीला आले आहे. काही जण त्यांना मिठी मारून शुभेच्छा देत आहे. ‘पुष्पा दा राईज’ या चित्रपटाने जगभरात तब्बल ४०० कोटींहून अधिक कमाई केली होती. हिंदी भाषेतही हा चित्रपट खूप पसंत केला गेला होता.