'उरी' चित्रपट लवकरच 'या' भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार

तसेच बॉक्सऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

उरी: द सर्जिकल स्ट्राईक (फोटो सौजन्य-ट्वीटर)

2019 ची सुरुवात धमाकेदार अशा 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' (Uri: The Surgical Strike) या चित्रपटाने झाली. तसेच बॉक्सऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याची मुख्य भूमिका सर्वांच्या अंगावर काटा आणणारी आहे.

उरी हा चित्रपट 2016 रोजी भारतीय सैन्याने सर्जिकला दिलेल्या प्रत्युत्तरावर आधारित असलेल्या खऱ्या कथेवर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने बॉक्सिऑफिसवर नऊ दिवसांत 91.84 कोटींची कमाई केली आहे. तर आता लवकरच हा चित्रपट साऊथ भाषेमध्ये म्हणजेच तेलगु, मल्याळम आणि तमीळ भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (हेही वाचा-संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण Uri: The Surgical Strike सिनेमाच्या कलाकारांच्या भेटीला)

या चित्रपटाची निर्मिती आरएसवीसी प्रोडक्शनने (RVS Production) केली असून केदारनाथ नंतरचा उरी हा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. तसेच या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका योग्यरितीने पार पाडली आहे.



संबंधित बातम्या