Jug Jugg Jeeyo च्या सेटवर कोरोनाचा हैदोस! वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर आढळले COVID-19 पॉझिटिव्ह

ही बातमी कळताच या चित्रपटाचे शूटिंग तात्काळ थांबविण्यात आले आहे.

Varun Dhawan, Anil Kapoor And Neetu Singh (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) गेल्या काही महिन्यांत अनेकांचा जीव घेतला आहे. तसेच अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. अशातच आतापर्यंत न केवळ सामान्यांना तर अनेक दिग्गज कलाकार, राजकीय नेत्यांनीही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक बातमी कानावर येत आहे. आगामी हिंदी चित्रपट 'जुग जुग जियो' (Jug Jugg Jeeyo )च्या सेटवर कोरोनाने हैदोस घातला असून या सेटवर काम करणा-या या चित्रपटातील कलाकार वरुण धवन (Varun Dhawan), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू सिंह (Neetu Singh) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी कळताच या चित्रपटाचे शूटिंग तात्काळ थांबविण्यात आले आहे.

जुग जुग जियो या चित्रपटातील प्रमुख कलाकारांनाच कोरोनाची लागण झाल्याने तात्काळ या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे. दरम्यान वरुण, अनिल कपूर आणि नीतू सिंह सह या चित्रपटाचे निर्माते राज मेहता हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तथापि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.हेदेखील वाचा- Ram Setu: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर अक्षय कुमार सिनेमाच्या शूटींगसाठी अयोध्येत जाणार

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

मात्र मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे असे सांग्ण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या सेटवर कोरोनाशी संबंधित सर्व गाईडलाईन्सचे पालन केले जात होते. मात्र तरीही येथील कलाकारांना आणि दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाली आहे.

अलीकडेच या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली होती. ज्यात वरुण धवन, अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोहली हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. धर्मा प्रोडक्शन निर्मित हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.