Vanitha Vijayakumar: अभिनेत्री वनिता विजयकुमार आणि नृत्यदिग्दर्शक रॉबर्ट राजशी अडकणार लग्नबंधनात

वनिताचे हे चौथे लग्न आहे.

Vanitha Vijayakumar, Robert Raj | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तामिळ अभिनेत्री वनिता विजयकुमार (Vanitha Vijayakumar) आणि नृत्यदिग्दर्शक रॉबर्ट राज (Robert Raj) हे परस्परांसोबत विवाह करणार आहेत. हे जोडपं येत्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या 'सेव्ह द डेट' या शिर्षकाखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये विवाहाबाबत पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे वनिताचे हे चौथे लग्न (Vanitha Vijayakumar Wedding 2024) असणार आहे. ज्यामुळे वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनात आणखी एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि अभिनेता रॉबर्ट राजने (Robert Raj Wedding) बिग बॉस तमिळ (Bigg Boss Tamil) सीझन 6 मध्ये स्पर्धक म्हणून लोकप्रियता मिळवली. हे जोडपे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात आणि त्यांच्या आगामी विवाहाने चाहत्यांमध्ये आणि चित्रपट उद्योगात उत्सुकता निर्माण केली आहे.

अभिनेता आकाश सोबत घटस्फोट

ज्येष्ठ तमिळ अभिनेता विजयकुमार याची मुलगी आणि अभिनेता अरुण विजय याची सावत्र बहीण वनिता विजयकुमार हिने 2000 मध्ये अभिनेता आकाश याच्याशी लग्न केले. या विवाहापासून तिला दोन मुले आहेत. बालसंगोपनावरील प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर 2005 मध्ये त्यांचे लग्न घटस्फोटात परावर्तीत झाले आणि संपले. त्यांचा मुलगा सुरुवातीला त्याच्या आजोबांकडे राहिला, परंतु नंतर तो त्याचे वडील आकाश यांच्याकडे राहायला गेला. (हेही वाचा, तमिळ अभिनेत्री विजयलक्ष्मी ने केला आत्महत्येचा प्रयत्न; आपला शेवटचा व्हिडिओ असल्याची फेसबुकवरुन दिली माहिती)

उद्योगपती आनंद जय राजन यांच्यासोबतही घटस्फोट

दरम्यान, सन 2007 मध्ये तामिळी अभिनेत्री वनिता यांनी उद्योगपती आनंद जय राजन यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून या जोडप्याने एका मुलीस जन्म दिला. तथापि, त्यांचे संबंधही पुढे सन 2012 मध्ये घटस्फोटात परावर्तीत झाले आणि संपले. आनंदने त्यांच्या मुलाचा ताबा मिळवला. वनिता हिने आरोप केला आहे की तिच्या वडिलांशी झालेल्या वादामुळे तिचे दुसरे लग्न मोडले. दरम्यान, तिच्या दुसऱ्या घटस्फोटानंतर, वनिता तिच्या आताच्या मंगेतर रॉबर्ट राजसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यांनी 2015 मध्ये एमजीआर शिवाजी रजनी कमल या चित्रपटात एकत्र काम केले. जरी त्यांनी 2017 मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आणले असले तरी, या जोडप्याने त्यांचे प्रणय पुन्हा जागृत केला आहे. ज्याचे पर्यावसन आगामी विवाहात होत आहे. (हेही वाचा, डिलिव्हरी बॉयकडून मोबाईल क्रमांक अश्लील ग्रुप मध्ये टाकल्याचा तमिळ अभिनेत्री गायत्री साई हिचा धक्कादायक आरोप)

पीटर पॉलशी सोबतचेही लग्न कायदेशीर अडचणीत

सन 2020 मध्ये, वनिता हिने त्या वेळी आधीच विवाहित असलेल्या छायाचित्रकार पीटर पॉलशी लग्न केले, ज्यामुळे पीटरची पत्नी एलिझाबेथ हिने अधिकृत घटस्फोट न घेता लग्न केल्याबद्दल या जोडप्याच्या विरोधात पोलिसात खटला दाखल केला. परिणामी कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या. वनिता आणि पीटर यांचे लग्नही 2020 मध्ये परस्पर संमतीने संपुष्टात आले. आता वनिता विजयकुमार तिचा माजी प्रियकर आणि दीर्घकालीन सहकारी रॉबर्ट राजशी लग्न करण्याची तयारी करत आहे. हा विवाह तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे. तिचे चाहते 5 ऑक्टोबर 2024 रोजी मोठ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif