बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तोडला रेकॉर्ड; New Year पार्टीमध्ये 1 तास डान्स परफॉर्मसाठी घेणार 'एवढी' रक्कम!
Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) New Year पार्टीमध्ये 1 तास डान्स परफॉर्म करण्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचे मानधन घेणार आहे. एवढी रक्कम घेऊन उर्वशीने बॉलिवूडच्या सर्व कलाकारांचा रेकॉर्ड तोडला आहे. आतापर्यंत एक तासाच्या परफॉर्मसाठी कोणत्याही कलाकाराने एवढी रक्कम आकारलेली नाही. बोल्ड सिनमुळे उर्वशी नेहमी चर्चेत असते. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उर्वशी न्यू इअर पार्टीमध्ये वेगवेगळ्या गाण्यावर परफॉर्म करताना दिसणार आहे. उर्वशी  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमी आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये उर्वशी खूपच हॉट दिसते. उर्वशीचे अनेक चाहते तिचे हे बोल्ड फोटो लाइक करत असतात. उर्वशीने आपली फिगर अगदी मेन्टेन ठेवली आहे. त्यामुळे अनेकांना उर्वशीचा फिटनेस लूक आवडतो. (हेही वाचा - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान केवळ एका जाहिरातींसाठी घेतो एवढी रक्कम! आकडा ऐकून व्हाल थक्क

काही दिवसांपूर्वी उर्वशीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये उर्वशी छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लासोबत दिसत आहे. चित्रपटसृष्टीत उर्वशी आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्या अफेअर्सच्या चर्चा आहेत. कारण, काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याच कुत्र्याचा फोटो शेअर केला होता.

परंतु, उर्वशीने या सर्व अफवा असल्याचं सांगून विषय टाळला होता. 2018 मध्ये या दोघांना एका पार्टीत एकत्र पाहण्यात आलं होतं. तसेच उर्वशीनेही तिच्या इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.