उर्वशी रौतेला हिचा हॉट वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला फिटनेस फ्रीक आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण अनेकदा ती सोशल मीडियावर आपले वर्कआऊट व्हिडिओज पोस्ट करत असते.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) फिटनेस फ्रीक आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण अनेकदा ती सोशल मीडियावर आपले वर्कआऊट व्हिडिओज पोस्ट करत असते. अलिकडेच उर्वशीने आपला नवा फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जीममध्ये वर्कआऊट करतान दिसत आहे. चेस्ट एक्सरसाईज करत असलेल्या उर्वशीने हातात 12-12 किलोचे डंबल्स उचलले आहेत. (डान्स करताना अभिनेत्री उर्वशी रौतेला पडली स्विमिंग पूलमध्ये, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
उर्वशीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, "5 वर्कआऊट करणाऱ्या लोकांना टॅग करा."
पहा व्हिडिओ:
फोटोज:
उर्वशी रौतेला मॉडेल असून 2013 मध्ये तिने 'सिंह साहब द ग्रेट' या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'रेस-3', 'सनम रे', 'भाग जॉनी', 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'काबिल' यांसारख्या सिनेमातून काम केले आहे. मात्र आतापर्यंत तिचा कोणताही सिनेमा हिट ठरलेला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2019 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

