अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा लाल जॅकेटमधील बोल्ड फोटोशूटने सोशल मिडियावर लावली आग, Watch Video
त्यात तिच्या हॉट अदा सर्वांचेच लक्ष वेधून घेतायत.
'सिंह साहब द ग्रेट' (Singh Saab the Great) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेली (Urvashi Rautela) तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांमुळे सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. तिचे हटके फोटोशूट आणि सेक्सी व्हिडिओज सोशल मिडियावर खूप व्हायरलही होतात. फिटनेस बाबतीतही नेहमी आग्रही असलेली उर्वशी आपले एकाहून एक सरस व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने तिचा एक बोल्ड आणि हॉट असा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच तिला आतापर्यंत 21 लाखांच्या वर लाइक्स मिळाले आहेत.
या व्हिडिओत तिने काळ्या रंगाची ब्रा घातली असून त्यावर लाल रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. त्यात तिच्या हॉट अदा सर्वांचेच लक्ष वेधून घेतायत. पाहा व्हिडिओ
याआधीही उर्वशीने आपला नवा फिटनेस व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. ज्यात ती चेस्ट एक्सरसाईज करत हातात 12-12 किलोचे डंबल्स उचलताना दिसत आहे.
उर्वशी रौतेला हिचा हॉट वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
उर्वशी रौतेला मॉडेल असून 2013 मध्ये तिने 'सिंह साहब द ग्रेट' या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'रेस-3', 'सनम रे', 'भाग जॉनी', 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'काबिल' यांसारख्या सिनेमातून काम केले आहे. मात्र आतापर्यंत तिचा कोणताही सिनेमा हिट ठरलेला नाही.