Urfi Javed New Outfit: उर्फी जावेदने घातला काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला 20 किलोचा ड्रेस; पार्टीत राखी सावंतसोबत केला जबरदस्त डान्स, Watch Video

यामध्ये काचेचे जड तुकडे वापरण्यात आले होते.

Urfi Javed Glass Outfit (PC - Instagram)

Urfi Javed New Outfit: उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी तिचे नवीनतम फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या आउटफिटमुळे (Urfi Javed Outfit) चर्चेत असते. तिने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 3 मिलियन (30 लाख) फॉलोअर्स ओलांडले आहेत. त्यानंतर तिने काचेच्या तुकड्यांनी बनवलेला असामान्य ड्रेस (Glass Outfit) घातला आणि इतर टीव्ही स्टार्ससोबत पार्टी केली होती.

उर्फी जावेदच्या या ड्रेसचे वजन 20 किलोपेक्षा जास्त होते. यामध्ये काचेचे जड तुकडे वापरण्यात आले होते. बिग बॉस OTT चा भाग असलेल्या उर्फी जावेदने मुंबईतील एका क्लबमध्ये एक आलिशान पार्टी दिली. ज्यामध्ये राखी सावंत, अक्षित सुखीजा आणि प्रियांक शर्मा सारखे टीव्ही स्टार्स उपस्थित होते. या पार्टीत उर्फीने पांढऱ्या ड्रेसवर जाड काचेचे तुकडे वापरले होते. (हेही वाचा - Urfi Javed Hot Video: उर्फी जावेदने स्किन कलरची ब्रा आणि मिनी स्कर्टमध्ये दिले Hot पोज, व्हिडीओ व्हायरल)

डान्स फ्लोअरवर डान्स करताना उर्फी जावेदचा आनंद स्पष्ट दिसत होता. या पार्टीत ती कमालीची दिसत होती आणि इंस्टाग्रामवर लोकांनी तिच्या लुकची खूप प्रशंसा केली आहे. उर्फी जावेद पार्टीनंतर राखी सावंत आणि प्रियांक शर्मा सारख्या स्टार्ससोबत पोज देताना दिसली. उर्फी याआधीही राखी सावंतसोबत दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmozo (@filmozo)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर उर्फी जावेद बिग बॉस ओटीटी सोडल्यानंतर काही छोट्या प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे आणि काही जाहिराती शूट केल्या आहेत. मात्र, तिच्या आउटफिट्समुळे ती दररोज चर्चेत असते. उर्फी जावेदने आतापर्यंत सॉक्सपासून प्लास्टिकच्या पिशव्यांनी बनवलेला ड्रेस परिधान केले आहेत.