'उजडा चमन' चित्रपटातील अभिनेत्री मानवी गगरु हिला ऑडिशन वेळी रेप सीन करुन दाखवण्यास सांगितल्याचा धक्कादायक खुलासा

मात्र नेहमीच कास्टिंग काउच मुळेच बॉलिवूड मध्ये वाद निर्माण झाल्याचे ही दिसून आले आहेत. तर मीटू मोहिमेनंतर आता पुन्हा एकदा 'उजडा चमन' (Ujda Chaman) मधील अभिनेत्री मानवी गगरु (Maanvi Gagroo) हिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला आहे.

Maanvi Gagroo (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मध्ये गेल्या वर्षात #MeToo अंतर्गत काही महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या गैरप्रकारांना वाचा फोडली होती. मात्र नेहमीच कास्टिंग काउच मुळेच बॉलिवूड मध्ये वाद निर्माण झाल्याचे ही दिसून आले आहेत. तर मीटू मोहिमेनंतर आता पुन्हा एकदा 'उजडा चमन' (Ujda Chaman) मधील अभिनेत्री मानवी गगरु (Maanvi Gagroo) हिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला आहे. मानवी हिने एका मुलाखतीत असे सांगितले की, ती जेव्हा ऑडिशनसाठी गेली असता तिच्याकडे विचत्र प्रकारची मागणी करण्यात आली.

'मानवी उजडा'  चमन मध्ये सनी सिंह याच्या विरुद्ध दिसून आली होती. त्याचसोबत टीवीएफ ट्रिपलिंग आणि फोर मोर शॉट्स सारख्या वेबसीरिजमध्ये सुद्धा झळकली होती, मानवीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने दिलेल्या एका ऑडिशन बाबत खुलासा केला आहे. मानवी हिने असे सांगितले की, जेव्हा ती इडस्ट्रीमध्ये नव्हती त्यावेळी तिच्यासोबत कास्टिंग काउचचा प्रकार घडला होता. नेमक कास्टिंग काउच म्हणता येणार नाही पण मी एका ऑडिशन मधून पळाली होती. कारण तेथे बसलेल्या दोन व्यक्तींसोबत रेप सीन करण्यास सांगण्यात आले होते. त्याचसोबत ऑडिशनसाठीचे ऑफिस सुद्धा एकदम भयानक होते. तेथे एक बेड सुद्धा ठेवण्यात आला असल्याचे मानवी हिने सांगितले.(Box Office Report: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित Bala ने केली पहिल्या दिवशी इतकी कमाई)

 

View this post on Instagram

 

If equal affection cannot be/ Let the more loving one be me. #themorelovingone by #whauden via @brainpicker 📷 @balvindersinghphotography

A post shared by Maanvi Gagroo (@maanvigagroo) on

त्यापुढे मानवी हिने असे ही सांगितले की, ऑडिशन दरम्यान मला स्वत:लाच तेथे थांबण्यास भीती वाटत होती. मानवी उजडा चमन पासून पण दुरावणर होती. कारण तिला या चित्रपटासाठी वजन वाढवण्यास सांगितले होते, तर मानवी आता तिचा आगामी चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मध्ये दिसून येणार आहे.