Coronavirus: बॉलिवूड चित्रपट निर्माते करण जौहर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटूंब क्वारंटाईन
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. सर्वसामन्यांपासून राजकीय नेते आणि कलाकारही कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहे.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. सर्वसामन्यांपासून राजकीय नेते आणि कलाकारही कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहे. यातच बॉलिवूडचे चित्रपट निर्माते करण जौहर (Karan Johar) यांच्या घरात काम करणाऱ्या 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे दिसताच त्यांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते, अशी माहिती करण जौहर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. यातच करण जौहर यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. करण जौहर यांच्या घरात काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वता करण जौहरने याची माहिती दिली आहे. मात्र, आमचा पूर्ण परिवार सुरक्षित आहे आणि कोणातही कोरोनाची लक्षणे दिसून आली नाही. आमच्या कुटुंबियांतील सर्वांची कोरोना चाचणी झाली आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही स्वताला सेल्फ क्वारंटाईन कक्षात ठेवले आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन; सेक्रेड गेम्स, सैराट, फँड्री सह अनेक दर्जेदार कलाकृतींमधून आले होते रसिकांच्या भेटीला!
करण जौहर यांचे ट्वीट-
याआधी बॉलिवूडचे वरिष्ठ अधिकारी किरण कुमार यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. किरण कुमार 74 वर्षाचे असून गेल्या काही दिवासांपूर्वी त्यांनी मेडिकल चाचणी केली होती. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनाचा अहवाल आल्यानंतर किरण कुमार यांनी स्वताला होम क्वारंटाईन केले होते. तसेच बॉलिवूड गायिका कनिका कपूर, करीम मोरीनी आणि त्यांच्या दोन मुलींना कोरोनाची लागण झाली होती.