Happy Birthday Tejasswi Prakash: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तेजस्वी प्रकाशचा अभिनयाच्या दुनियेतील प्रवास
तेजस्वी प्रकाशचा जन्म 10 जून 1993 रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात झाला. तेजस्वीचे पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर आहे. ती एका संगीत कुटुंबातील आहे. तेजस्वीचे वडील प्रकाश वायंगणकर हे एक उत्तम गायक असून ते दुबईत काम करतात.
'बिग बॉस 15' ची विजेती आणि 'नागिन 6' ची मुख्य अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. गंमत म्हणजे यावेळी तेजस्वी आपला वाढदिवस कुटुंबासोबत नाही तर बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत (Karan Kundra) साजरा करत आहे. ती सध्या गोव्यात करणसोबत रोमँटिक बर्थडे डेटवर आहे. तेजस्वी प्रकाशचा जन्म 10 जून 1993 रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात झाला. तेजस्वीचे पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर आहे. ती एका संगीत कुटुंबातील आहे. तेजस्वीचे वडील प्रकाश वायंगणकर हे एक उत्तम गायक असून ते दुबईत काम करतात. तेजस्वीचा जन्म जेद्दाहमध्ये झाला असेल, पण ती मराठी भाषिक कुटुंबात लहानाची मोठी झाली आहे. कदाचित त्यामुळेच तिला शास्त्रीय संगीताची आवड आहे आणि तिने सुमारे चार वर्षे भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतले.
अभिनेत्री होण्यापूर्वी होती इंजिनियर
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील सर्वात शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अभ्यासादरम्यान तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, तेजस्वी प्रकाश अभिनेत्री होण्यापूर्वी इंजिनियर होती. मात्र, एका प्रोजेक्टवर काम करत असताना वृत्तपत्रांवर तिची छायाचित्रे येताच तिचे आयुष्य बदलून गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'मुंबई फ्रेश फेस' स्पर्धा जिंकल्यानंतर एका प्रोडक्शन हाऊसने तिच्या टीव्ही शोसाठी तिच्याशी संपर्क साधला. यानंतर तेजस्वी प्रकाशने अभियांत्रिकी व्यवसाय सोडून अभिनयाच्या विश्वात प्रवेश केला.
मालिकेतुन केले पदार्पण
तेजस्वीने 2012 मध्ये लाइफ ओकेच्या '2612' या मालिकेतून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. यानंतर ती 'संस्कार-धरोहर अपना की', 'पहरेदार पिया की' आणि 'रिश्ता लिखेंगे हम नया' सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये दिसली. तिला खरी ओळख 2015 मध्ये आलेल्या 'स्वरागिनी - जोडे रिश्तों के सूर' या मालिकेतून मिळाली असली तरी यात तिने रागिणीची भूमिका साकारली होती. 'स्वरागिनी' नंतर, 2018 मध्ये ती 'कर्ण संगिनी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का' मध्ये देखील दिसली. ती टीव्हीच्या फियर फॅक्टर 'खतरों के खिलाडी सीजन-10' मध्ये दिसली आहे. यानंतर ती 'बिग बॉस 15' ची विजेती ठरली आणि सर्वांच्याच मनात घर करून गेली. तेजस्वी प्रकाश 'सुन जरा', 'ए मेरे दिल', 'फकिरा', 'दुआ है आणि मेरा पहला प्यार' सारख्या म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे.
करण कुंद्रासोबतच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत
एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही शो 'नागिन 6' मुळे आजकाल तेजस्वी प्रकाश प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामध्ये त्याच्या अभिनयाची आणि निरागसतेने लोकांना भुरळ घातली आहे. याशिवाय तेजस्वी अभिनेता करण कुंद्रासोबतच्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. लोकांना त्यांची जोडी खूप आवडते. (हे देखील वाचा: Man Kasturi Re: तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमातून पदार्पणासाठी सज्ज, अभिनय बेर्डेसोबत दिसणार खास भूमिकेत)
लवकरच दिसु शकते चित्रपटात
तेजस्वी प्रकाश टीव्हीनंतर लवकरच चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवताना दिसणार आहे. अशी बातमी आहे की, अभिनेत्री आयुष्मान खुरानाच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, तिने आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिले आहे. जर सर्व काही ठीक झाले तर, अभिनेत्री लवकरच आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. तसेच "मन कस्तुरी रे" या मराठी चित्रपटात ती अभिनय बेर्डे सोबत देखील दिसणार आहे. चाहते तेजस्वीला मराठी सिनेमात पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)