Tiger Shroff चा 'हा' Shirtless फोटो पाहून तरूणी होतील घायाळ, See Viral Photo
हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत
लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याची अफलातून डान्स स्टाईल, जबरदस्त अॅक्शन स्टंट्स पाहून नवीन पिढीमध्ये त्याची प्रचंड क्रेज आहे. अशा हॉट अभिनेत्याला शर्टलेस पाहण्याची अनेक तरुणींची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण होईल टायगर श्रॉफचा हा हॉट फोटो (Hot Photo) पाहून... स्वत: टायगर हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) लूक पाहून तरुणी घायाळ झाल्याखेरीज राहणार आहे.
टायगर श्रॉफने गुलाबी रंगाची हटके शॉर्ट्स घालून स्वत:च या शॉर्ट्सचे कौतुक केले आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.हेदेखील वाचा- Ganpath Part 1: 'गणपत' सिनेमाच्या टीझर पोस्टरवर टायगर श्रॉफ याचा दमदार अंदाज (Watch Video)
टायगर श्रॉफच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपट 'गणपत' चा टीजर प्रदर्शित झाला. तसेच लवकर तो आपल्याला बागी 4 या चित्रपटात देखील दिसणार आहे.
गणपत हा सिनेमा टायगर श्रॉफ याच्या दुसऱ्या सिनेमांपेक्षा अगदी वेगळा आहे. त्यामुळेच या सिनेमाचा भाग असल्याने टायगर श्रॉफ अत्यंत आनंदी आहे. या सिनेमाच्या माध्यमातून टायगर पहिल्यांदाच जॅकी आणि विकास बहल सोबत काम करणार आहे. दरम्यान, या टीमसोबत काम करताना आनंद होत असल्याचे टायगरने सांगितले आहे.
टायगर श्रॉफच्या आणखी दोन अॅक्शन चित्रपटांची घोषणा झाली आहे. यातील एक म्हणजे 'हीरोपंती 2' आणि दुसरा म्हणजे 'बागी 4'. हे दोन्ही चित्रपट टायगरच्या चित्रपटांची फ्रॅंचायझी आहेत. टायगरने हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनॉन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यानंतर, टायगर श्रॉफ बागी 4 चे शुटिंग सुरू करण्याची शक्यता आहे. हे दोन्ही चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करीत आहेत.