टायगर श्रॉफ आपल्या लाडक्या 'JD' च्या निधनाने झाला भावूक, फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
तो त्याला त्याच्या भावासारखा होता असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) चा 'बागी 3' (Baaghi 3) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. त्यामुळे टायगर श्रॉफही आनंदून गेला आहे. मात्र त्याच्या या आनंदावर विरजण आणणारी एक अत्यंत वाईट घटना त्याच्या घरात घडली आहे ज्यामुळे टायगर श्रॉफ खूपच दुखावला गेला आहे. टायगरचे लाडके मांजर 'जेडी' (JD) चा मृत्यू झाल्याने टायगरला आपले दु:ख अनावर झाले आहे. हा जेडी म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. त्याच्या अचानक जाण्याने टायगर खूप दु:खी झाला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याने भावूक पोस्ट शेअर करत आपले दु:ख व्यक्त केले आहे.
या पोस्टमध्ये जेडी हा गेली 17 वर्ष त्याच्या सोबत होता. तो त्याला त्याच्या भावासारखा होता असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
टायगर श्रॉफची पोस्ट:
जेडी ने दिलेल्या प्रेमाचे आभार मानत ईश्वर त्याच्या आत्म्यास शांति देवो असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. टायगर श्रॉफ ची भावूक पोस्ट पाहून त्याचे जेडीवर किती प्रेम होते हे दिसून येते.
टायगरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, 'बागी 3' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. गेल्या आठ दिवसांत बागी 3 ने 95.70 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचबरोबर अंकिता लोखंडे, रितेश देशमुख देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.