Tiger Shroff Casanova Trailer: कैसनोवा बनलेल्या टायगर श्रॉफ चा नवीन गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित, Watch Video

या अभिनेत्याचे या गाण्यातील डान्स मूव्ह्स तुम्हालाही थिरकायला लावतील असेच आहे.

Tiger Shroff Casanova (Photo Credits: Instagram)

तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या नव्या गाण्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्यातील त्याचा ग्लॅमरस लूक पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले आहेत. 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर टायगर श्रॉफ चाहत्यांसमोर वेगवेगळ्या अंदाजात दिसला. अॅक्शन सीनमध्ये हातखंडा असलेला टायगर आता आपल्या गाण्याने तरुणींवर मोहिनी घालणार आहे. 'कैसनोवा' (Casanova) असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचा ट्रेलर टायगरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

कैसनोवा गाण्याच्या ट्रेलरमध्ये टायगरच्या लूकची जितकी चर्चा होतेय तितक्याच त्या हटके डान्सची देखील... या अभिनेत्याचे या गाण्यातील डान्स मूव्ह्स तुम्हालाही थिरकायला लावतील असेच आहे.

हेदेखील वाचा- Hrithik Roshan आणि Deepika Padukone यांची प्रमुख भूमिका असलेला 'Fighter' चित्रपटाचा टीजर आला समोर, 'ही' आहे प्रदर्शनाची तारीख

पाहा ट्रेलर

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

आपल्या गाण्याच्या ट्रॅकचा ट्रेलर प्रदर्शित करुन टायगर या पोस्ट खाली, "तुला पाहण्याआधी मी कैसनोवा होतो!!!! सादर करीत आहे माझ्या नवीन गाण्याचा प्रीव्ह्यू. आशा आहे तुम्हाला पसंत येईल." असे कॅप्शन दिले आहे. हे पूर्ण गाणे टायगरच्या युट्यूब पेजवर 13 जानेवारीला प्रदर्शित होईल. असेही त्याने सांगितले आहे.

या ट्रॅकचे निर्देशन पुनीत मल्होत्रा याने केले आहे.क्युकी आणि टायगरने या गाण्याची निर्मिती केली असून याचे गीतकार अवितेश आहेत. तर ट्रैक्फॉर्मॉज़ याचे संगीत निर्मिती केली आहे. परेश हे या गाण्याचे कोरियोग्राफर आहेत.

टायगरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तर तो लवकरच बागी 4, हिरोपंती 2 आणि गणपत या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडे त्याच्या आगामी चित्रपट 'गणपत' चे टीजर पोस्टर प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. यात टायगर श्रॉफचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. विशेष म्हणजे यात टायगरचा एक जबरदस्त डायलॉग देखील ऐकायला मिळत आहे. तो म्हणतो, "आपनु डरता है ना तो आपनु बहुत मारता है."