Ganapath Teaser Out: टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन स्टारर 'गणपत' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना 2070 च्या दशकात घेऊन जाणार चित्रपट, पहा व्हिडिओ

जे चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाते. आतापर्यंत भारतात क्वचितच असा प्रयत्न केला गेला आहे. जॅकी भगनानीने जागतिक दर्जाचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

Ganapath Teaser (Photo Credits: Youtube)

Ganapath Teaser Out: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) पुन्हा एकदा आपल्या दमदार अ‍ॅक्शनने चाहत्यांची मने जिंकण्यासाठी येत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. पोस्टर शेअर करताना टायगरने यापूर्वी 27 सप्टेंबरला टीझर रिलीज करण्याची घोषणा केली होती पण सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटामुळे गणपतचा टीझर रिलीज झाला नाही. या चित्रपटाच्या माध्यामातून निर्मात्यांनी सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या नवीन युगात प्रवेश केला आहे. जो जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणारा ठरणार आहे. टीझरमध्ये गणपतच्या जगाची एक आकर्षक झलक, आंतरराष्ट्रीय मानकांशी टक्कर देणारा सिनेमॅटिक अनुभव देतो. टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना 2070 मध्ये घेऊन जाणार आहे.

या टीझरमध्ये दमदार व्हीएफएक्स दिसून येत आहे. जे चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाते. आतापर्यंत भारतात क्वचितच असा प्रयत्न केला गेला आहे. जॅकी भगनानीने जागतिक दर्जाचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही. चित्रपटाचा टीझर हा त्याचा पुरावा आहे जो केवळ उत्कंठा वाढवत नाही तर प्रेक्षकांना त्याच्या दृश्य भव्यतेने थक्क करतो. क्वीन आणि सुपर 30 चे दिग्दर्शक विकास बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या भविष्यकालीन अॅक्शन शोमध्ये टायगर श्रॉफ, क्रिती सॅनॉन आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासह पॉवर-पॅक कलाकार आहेत. (हेही वाचा - Prabhas' Salaar Movie Release Date: डंकीला टक्कर देण्यासाठी सालार चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित)

गुड कंपनीच्या सहकार्याने पूजा एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि विकास बहल दिग्दर्शित, गणपत - अ हिरो इज बॉर्नची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. यात टायगर श्रॉफ, क्रिती सॅनॉन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये जगभरात रिलीज होणार आहे.