Bollywood Actress Suicide 2022: बॉलिवूडमध्ये 'या' अभिनेत्रींनी आत्महत्या करून दिला आपल्या चाहत्यांना धक्का; मृत्यूला कवटाळण्यामागचं काय आहे कारण? जाणून घ्या
आज आपण या लेखातून 2022 मध्ये आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संवलेल्या अशा अभिनेत्र्यांविषयी जाणून घेणार आहोत.
Bollywood Actress Suicide 2022: 2022 साली अनेक बॉलीवूड स्टार्संनी जगाचा निरोप घेतला. काही अभिनेत्र्यांनी यावर्षी अतिशय टोकाचे पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. या स्टार्सनी आत्महत्या (Suicide) का केली, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मग ते सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण असो वा तुनिषा शर्माचे.
गेल्या आठवड्यात टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येमुळे सर्वांनाचं धक्का बसला. तुनिषाच्या आईने अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड शीझान खान याच्यावर आपल्या मुलीला आत्म्हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. आज आपण या लेखातून 2022 मध्ये आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संवलेल्या अशा अभिनेत्र्यांविषयी जाणून घेणार आहोत. (हेही वाचा - Tunisha Sharma Death Case: शीजानने तिला इस्लामचे पालन करण्यास भाग पाडले; तुनिशाच्या आईचा आरोप)
1. तुनिषा शर्मा -
अभिनेत्री तुनिषा शर्मा 20 वर्षांची होती, जिने फार कमी वेळात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अली बाबा: दास्तान-ए-काबुल स्टार तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. शोच्या सेटवर तिने गळफास लावून घेतला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तुनिषाचा माजी प्रियकर शीजान खान याला अटक केली आहे. अभिनेत्रीच्या आईने शीजानवर तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस अजूनही शीजनची चौकशी करत आहेत.
2. वैशाली टक्कर -
अभिनेत्री वैशाली टक्कर हिने इंदूरमधील तेजाजी नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 'ससुराल सिमर का' मधील अंजली भारद्वाजच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध होती. ही घटना 16 ऑक्टोबर 2022 रोजी घडली. अभिनेत्रीच्या आत्महत्येजवळ एक सुसाईड नोटही सापडली होती. त्या चिठ्ठीवरून असे समजले की, ती तिचा शेजारी राहूल नवलानीवर नाराज होती. राहूलला तिला अडीच वर्षे मानसिक छळ केल्याबद्दल शिक्षा व्हावी, अशी इच्छा तिने सुसाईड नोटमध्ये लिहिली होती.
3. पल्लवी डे -
बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने 15 मे 2022 रोजी आत्महत्या केली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कोलकाता येथील फ्लॅटमध्ये अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह एमआर बांगूर रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. तसेच त्याच्या फ्लॅटमधून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. अभिनेत्रीने असे पाऊल का उचलले याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
4. बिदिशा दे मजुमदार -
अभिनेत्री बिदिशा डी मुझुमदार हिनेही आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी तिने पल्लवी डे यांच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला होता. धक्कादायक बाब म्हणजे बिदिशा दे मुझुमदार यांनी बुधवारी 25 मे 2022 रोजी पल्लवीच्या मृत्यूच्या शोकानंतर 10 दिवसांनी आत्महत्या केली.
5. मंजुषा नियोगी -
कांची अभिनेत्री मंजुषा नियोगी हिने 27 मे 2022 रोजी आत्महत्या केली. कोलकाता येथील राहत्या घरी ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. मंजुषा आपल्या कुटुंबासह कोलकात्यातील पाटुली भागात राहत होती. मॉडेलच्या आईने दावा केला की तिची जवळची मैत्रीण बिदिशा डी मजुमदारच्या मृत्यूनंतर ती तीव्र नैराश्याने ग्रस्त होती.
6. रश्मिरेखा ओझा -
जूनमध्ये लोकप्रिय ओडिया अभिनेत्री रश्मिरेखा ओझा भुवनेश्वरमध्ये तिच्या भाड्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. अभिनत्रीच्या वडिलांनी तिच्या मुलीच्या मृत्यूमागे तिचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रा असल्याचा आरोप केला होता. तथापि, अभिनेत्रीने सुसाईड नोटमध्ये तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं होतं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)