Year Ender 2023: कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा, स्वरा भास्कर यांच्यासह 'या' सेलिब्रिटींनी 2023 मध्ये बांधली लग्नगाठ, पहा खास फोटोज
ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
Year Ender 2023: वर्ष संपण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास होते. यंदा बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट सुपरहिट ठरले, तर बॉलिवूडसाठीही हे वर्ष लग्नाचे वर्ष ठरले. यावर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्न केले. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. चला तर मग 2023 मध्ये कोणत्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली ते जाणून घेऊयात.
अथिया शेट्टी-केएल राहुल -
अथिया शेट्टी आणि केएल राहुल या जोडप्याचे लग्न या वर्षाच्या सुरुवातीला झाले. 23 जानेवारी रोजी मुंबईतील खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर या दोघांनी साथ फेरे घेतले. या जोडप्याच्या लग्नात फक्त जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नात दोघेही खूप सुंदर दिसत होते. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (हेही वाचा -Year Ender 2023: यंदा 'अॅनिमल' ते 'पठाण' पर्यंत यूट्यूबवर 'या' चित्रपटांचा ट्रेलर सर्वाधिक पाहण्यात आला, वाचा सविस्तर)
कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा -
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचेही याच वर्षी लग्न झाले. 7 फेब्रुवारी 2023 रोजी जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत या जोडप्याने अतिशय भव्य पद्धतीने लग्न केले.
स्वरा भास्कर-फहद अहमद -
अभिनेत्री स्वरा भास्करनेही याच वर्षी सपा नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर दिल्लीत मोठ्या थाटामाटात लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले. यानंतर दोघांनी जानेवारीत लग्नाची कागदपत्रे सादर केली. 16 फेब्रुवारीला दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले.
परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा -
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील यावर्षी 24 सप्टेंबर रोजी आप खासदार राघव चढ्ढा यांच्याशी लग्नगाठ बांधली. या दोघांचे लग्न अतिशय थाटामाटात पार पडले, ज्यात बॉलिवूड आणि राजकारणातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
सोनाली सहगल-आशेष सजनानी -
अभिनेत्री सोनाली सहगलनेही यावर्षी तिचा प्रियकर आशेष सजनानीसोबत लग्नगाठ बांधली. दोघांनी जून 2023 मध्ये लग्न केले.
वरुण तेज-लावण्य त्रिपाठी -
वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांचेही याच वर्षी लग्न झाले. या जोडप्याने इटलीमध्ये लग्न केले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शिवालिका ओबेरॉय-अभिषेक पाठक -
'खुदा हाफिज' सारख्या चित्रपटात दिसलेली शिवालिका ओबेरॉय हिनेही याच वर्षी लग्न केले. या जोडप्याने 2022 मध्ये एंगेजमेंट केली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी लग्न केले.
रणदीप हुडा-लिन लैश्राम -
नुकतेच 29 नोव्हेंबर रोजी रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी मणिपूरमधील इंफाळ येथे मेईतेई रितीरिवाजाने लग्न केले. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनी सात फेरे घेतले. लग्न झाल्यापासून नवविवाहित जोडपे इंटरनेटवर सतत त्यांच्या लग्नाची झलक शेअर करत आहेत.