Cyclone Tauktae: Salman Khan आणि Katrina Kaif च्या 'Tiger 3' चित्रपटाच्या सेटचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान

विशेष म्हणजे चक्रीवादळामुळे केवळ सलमान खानचं नव्हे तर अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाच्या सेटचेही नुकसान झालं आहे.

सलमान खान आणि कॅटरीना कैफ (Photo Credits: Instagram)

Cyclone Tauktae Sweeps Away 'Tiger 3' Sets: चक्रीवादळ तौक्तमुळे देशभरात बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. यामुळे फिल्म इंडस्ट्रीलाही त्रास सहन करावा लागला आहे. सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) च्या टायगर 3 (Tiger 3) च्या सेटवर चक्रीवादळाने कहर केला आहे. जोरदार वादळामुळे चित्रपटाचा सेट उडून गेला असून मोठे नुकसान झाले आहे.

ताज्या मीडिया रिपोर्टनुसार सलमान लवकरचं आपल्या टीमसोबत या सेटवर शूट करणार होता, पण आता वादळामुळे झालेल्या विध्वंसमुळे ही योजना रद्द करण्यात आली आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील एसआरपीएफ मैदानावर एक सेट बांधण्यात आला, ज्यामध्ये दुबईचा बाजार दाखवण्यात आला होता. पण वादळामुळे हा सेट तुटला आहे. (वाचा - Salman Khan चा 'Radhe' सिनेमाची फेसबुकवर 50 रुपयांत विक्री; 3 जणांविरोधात FIR दाखल)

विशेष म्हणजे चक्रीवादळामुळे केवळ सलमान खानचं नव्हे तर अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाच्या सेटचेही नुकसान झालं आहे. या चित्रपटाच्या सेटवरही वादळाने कहर केला. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानामुळे या चित्रपटाच्या शुटिंगला अधिक वेळ लागू शकतो.

दरम्यान, या वादळात संजय लीला भन्साळीने आपल्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचा सेट वाचवला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी त्याने आपला सेट कव्हर केला होता. याचा फायदा त्यांना 'तौक्ते' वादळातही झाला आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या सर्व चित्रपटाचे शुटिंग थांबवण्यात आले आहे.