Pathaan Trailer Release Date: शाहरुख खान आणि दीपिकाच्या 'पठाण' चित्रपटाचा दमदार ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज
पठाणमध्ये शाहरुख खान पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका-शाहरुखची जोडी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. चाहत्यांची उत्सुकता कायम ठेवत नुकताच सेटवर 'पठाण' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजसंदर्भात पडदा उठवण्यात आला आहे.
Pathaan Trailer Release Date: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे पहिले गाणे आल्यापासून लोक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाद्वारे बॉलीवूडचा बादशाह चार वर्षांनंतर चित्रपटगृहात परतत आहे. पठाणमध्ये शाहरुख खान पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका-शाहरुखची जोडी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. चाहत्यांची उत्सुकता कायम ठेवत नुकताच सेटवर 'पठाण' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजसंदर्भात पडदा उठवण्यात आला आहे.
पठाणच्या ट्रेलर रिलीजची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका पोस्टमध्ये शेअर केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, पठाणचा ट्रेलर 10 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो एका नव्हे तर तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू चाहत्यांना किंग खानच्या पठाणच्या ट्रेलरचा आनंद घेता येणार आहे. ट्रेलरची रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. (हेही वाचा - Besharam Rang Controversy: पठान चित्रपटातील 'बेशरम रंग' गाणे पाकिस्तानी गाण्याची कॉपी? जुने गाणे शेअर करत गायक Sajjad Ali चा मोठा आरोप (Watch))
#PathaanTrailer on 10 Jan 2023… #Pathaan [NO title change] arrives in *cinemas* on 25 Jan 2023 [#RepublicDay weekend] in #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/AbYCRn2W7s
— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2023
बेशरम गाणे रिलीज होताच पठाण चित्रपटावरून वाद -
शाहरुख खानच्या झिरो आणि माय नेम इज खानप्रमाणे पठाणही वादांपासून दूर राहू शकला नाही. या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांसमोर येताच सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेली भगव्या रंगाची मोनिकिनी चर्चेचा विषय ठरली. शाहरुख खानच्या चित्रपटाचा आणि गाण्याला मध्य प्रदेशपासून इंदूर आणि महाराष्ट्रात विरोध दर्शवला. सेन्सॉर बोर्डाच्या वतीनेही निर्मात्यांना चित्रपटातील गाणी आणि दृश्यांमध्ये बदल करून ते गुरुवारपर्यंत सीबीएफसीसमोर सादर करायचे आहेत.
पठाण हा चित्रपट यावर्षी 25 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यातील जबरदस्त अॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे त्रिकूट पहिल्यांदाच दिसणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2023 02:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

