Virat-Anushka च्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल; Watch Photo

विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विरुष्काच्या मुलीचे पहिले छायाचित्र शेअर केले आहे.

विराट कोहली -अनुष्का शर्मा (Photo Credits: Instagram)

Virat-Anushka Daughter Photo: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या कुटुंबात सोमवारी एका छोट्या परीचं आगमन झालं. ही गोड बातमी विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना दिली. विराट-अनुष्काच्या मुलीची बातमी सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. आता सोशल मीडियावर विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो व्हायरल होत आहे. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विरुष्काच्या मुलीचे पहिले छायाचित्र शेअर केले आहे. या फोटोत विरुष्काच्या मुलीचे केवळ पाय दिसत आहेत. तरीदेखील हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करताना विकास कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलं आहे की, "आनंद आला आहे. एका परीने कुटुंबात प्रवेश केला आहे." फोटोवर अनेक कार्टून इमोजी बनवून विकासने या गोंडस परीचं स्वागत केलं आहे. (Ashutosh Kulkarni-Ruchika Patil Wedding: 'असंभव' मालिकेतून घराघरात पोहोचलेला आशुतोष कुलकर्णी याचे अभिनेत्री रुचिका पाटील सह झाले 'शुभमंगल सावधान', See Pics)

दरम्यान, सोमवारी विराट कोहलीने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली होती. या पोस्टमध्ये विराटने म्हटलं होत की, "आम्हाला दोघाला हे सांगताना आनंद होत आहे की, आमच्या घरी आज दुपारी एका मुलीचा जन्म झाला. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही अगदी ठीक आहेत. "

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांचे लक्ष आता त्यांच्या मुलीच्या नावाकडे लागले आहे. विराट-अनुष्का आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार, याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बाबा अनंत महाराज विरुष्काच्या मुलीचे नाव ठरवू शकतात. या अगोदरही, बाबा अनंत यांनी दोघांच्याही आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. विराट-अनुष्का अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांच्या सूचना घेत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

11 डिसेंबर 2017 रोजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले आहे. दोघांच्या लग्नाची गुप्त योजना आखण्यात आली होती. मात्र, विराट आणि अनुष्काचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची बातमी समजली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif