Sushant Sing Rajput ची आत्महत्या नसून, त्याचा खून झाला असल्याची कुटुंबियांची शंका; सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांची माहिती
सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी सुशांतचा खून झाला असल्याची शंका उपस्थित केली आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Sing Rajput) आत्महत्या प्रकरणात आता एक नवीन वळण समोर आले आहे. सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी सुशांतचा खून झाला असल्याची शंका उपस्थित केली आहे. विकास सिंह म्हणाले आहेत की, या प्रकरणात आतापर्यंत आम्ही आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता, पण आता आम्हाला वाटते की सुशांतचा खून झाला आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय आत्महत्येच्या प्रकरणातून चौकशी करत आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका सुशांतच्या कुटुंबालाही असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.
14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करीत आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीच्या चौकशीला मुंबई पोलिसांनी आत्महत्या म्हटले आहे, पण सुशांतच्या चाहत्यांचा विश्वास आहे की त्याचा खून झाला असावा. आता हीच गोष्ट दिवंगत अभिनेत्याचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनीही सांगितली आहे. सुशांतच्या कुटुंबालाही त्याचा खून झाला असल्याचे वाटते, असे सिंह यांनी सांगितले आहे. (हेही वाचा: सुशांंत सिंह राजपूत ने स्वतः एका मुलाखतीत Claustrophobia असल्याची दिली होती कबुली, पहा हा Viral Video)
एएनआय ट्वीट -
सिंह यांनी सांगितल्या प्रमाणे सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पूर्वी दिसत होते आणि पाटणा येथे नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्येही याचा उल्लेख होता. मात्र आता यामध्ये खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे एनसीबीने अटक केलेला ड्रग डीलर Zaid Vilatra ला Esplanade Court समोर आज सादर केले गेले. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी त्याला काल अटक करण्यात आली होती. आता त्याला 9 सप्टेंबर पर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठविण्यात आले. असे सांगितले जात आहे की झैद शौविकसाठी ड्रग डीलर म्हणून काम करायचा. आज सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नीरज आणि केशव या दोघांची चौकशीही सीबीआय करत आहे.