Saif Ali Khan Attack Case: रक्ताने माखलेल्या सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरने सांगितली संपूर्ण कहाणी; नेमक काय घडलं? जाणून घ्या
ऑटो ड्रायव्हरने (Auto Driver) त्या रात्रीच्या संपूर्ण घटनेची कहाणी सांगितली आहे. ज्यामध्ये त्याने त्या रात्री काय घडले? आणि तो सैफला रुग्णालयात कसा घेऊन गेला? याबद्दल सर्वकाही सांगितले आहे. भजन सिंग राणा (Bhajan Singh Rana) असं या ऑटो ड्रायव्हरचं नाव आहे.
Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर गुरुवारी चाकूने हल्ला झाला. या घटनेनंतर रक्ताने माखलेल्या सैफ अली खानला ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. आता या ऑटो ड्रायव्हरने (Auto Driver) त्या रात्रीच्या संपूर्ण घटनेची कहाणी सांगितली आहे. ज्यामध्ये त्याने त्या रात्री काय घडले? आणि तो सैफला रुग्णालयात कसा घेऊन गेला? याबद्दल सर्वकाही सांगितले आहे. भजन सिंग राणा (Bhajan Singh Rana) असं या ऑटो ड्रायव्हरचं नाव आहे. भजन सिंग राणाने सांगितले की, मी लिंकन रोडवरून रस्त्यांवरून जात होतो. सैफ अली खानच्या घराजवळ पोहोचताच एक महिला धावत आली आणि रिक्षा रिक्षा म्हणू लागली. मी गेटच्या पुढे जाऊन थांबलो. मी पुढे जाऊन माझी रिक्षा पार्क केली, मग ती बाई गेटवर रिक्षा पार्क करायला सांगू लागली. यानंतर, मी यू-टर्न घेतला आणि रिक्षा गेटजवळ पार्क केली. तेवढ्यात काही लोक आले. त्यापैकी एक रक्ताने माखलेला होता. त्याने पांढरे कपडे घातले होते. मी त्यांना ऑटोमध्ये बसवले. यावेळी त्याच्या बरोबर एक मूलही होते.
सैफ म्हणाला मला लीलावती रुग्णालयात घेऊन चला -
ऑटो चालक भजन सिंह राणा यांनी पुढे बोलताना सांगितले की, त्यांच्यासोबत एक तरुण होता, जो सैफ अली खानसोबत बसला होता. मग सैफने मला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यांच्यापैकी एकाने विचारले, 'आपण होली फॅमिलीला जावे की लीलावतीला?' यावर सैफ म्हणाला की, त्याला लीलावतीला घेऊन जा. यानंतर मी त्याला लीलावती हॉस्पिटलकडे घेऊन गेलो. (हेही वाचा -Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; Mumbai police ची माहिती)
ऑटो चालकाने सांगितले की, तो सैफ अली खान आहे, हे मला माहित नव्हते. मलाही चिंता वाटली. मी तिथे पोहोचलो तेव्हा मी पाहिले की उतरल्यानंतर गार्डला फोन करण्यात आला. आम्ही त्याला आपत्कालीन दारापर्यंत नेले. त्यानंतर अभिनेत्याने आपण सैफ अली खान असून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर बोलावण्यात यावे, असं सांगितलं. त्यानंतर मला समजले की, हा सैफ अली खान आहे. (हेही वाचा -Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने मागितले होते 1 कोटी रुपये; कर्मचारी नर्सने कथन केली त्यावेळी घडलेली धक्कादायक घटना)
कुर्ता-पायजमा रक्ताने माखलेला होता -
ऑटो चालकाने सांगितले की, अभिनेत्याने कुर्ता-पायजमा घातला होता. त्याचा कुर्ता-पायजमा रक्ताने माखला होता. तो खाली उतरला तेव्हा मागूनही रक्त येत होते. त्याला पाहून वाटत होते की, गंभीर दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना सुमारे 2-3 वाजता घडली.
रुग्णालयात घेऊन जाताना सैफ सोबत कोण होतं?
सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाताना त्याच्यासोबत एक 7-8 वर्षांचा लहान मुलगा आणि एक तरुण होता. मी त्याला ओळखत नाही. मी त्यांच्याकडून पैसेही घेतले नाहीत. लीलावती रुग्णालयात दाखल असलेला सैफ अली खान आता धोक्याबाहेर आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी सैफ अली खानवर दोन शस्त्रक्रिया केल्या आहेत.
सैफला सध्या बेड रेस्टची गरज - डॉक्टर
दरम्यान, लीलावती रुग्णालयाने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार, सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो स्वतः चालण्यास सक्षम आहे. त्याला जास्त हालचाल करण्याची परवानगी नाही. तथापि, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागेल. सध्या त्याला विश्रांतीची गरज आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)