Satyaprem Ki Katha Trailer: प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली! कार्तिक-कियाराच्या 'सत्यप्रेम की कथा'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी 'सत्यनारायण की कथा' असे होते, परंतु त्याच्या शीर्षकावरून झालेल्या वादामुळे त्याचे नाव 'सत्यप्रेम की कथा' असे ठेवण्यात आले आहे.

Satyaprem Ki Katha Trailer: प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली!  कार्तिक-कियाराच्या 'सत्यप्रेम की कथा'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Satyaprem Ki Katha (PC - Instagram)

Satyaprem Ki Katha Trailer: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या त्यांच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि गाणे 'नसीब से' रिलीज झाले आहे. याशिवाय अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी एक नवीन पोस्टर समोर आले. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर येताच चाहते उत्साहित झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, अखेर ट्रेलर उद्या रिलीज होत आहे. दुसर्‍याने लिहिले, सत्तू आणि कथा यांना भेटण्याची वाट पाहत आहे. तर तिसर्‍या चाहत्याने लिहिले, आता चित्रपटाची प्रतीक्षा करू शकत नाही. (हेही वाचा - Who is Neelam Gill: नीलम गिल कोण आहे? भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत आहे हॉलिवूड स्टार Leonardo DiCaprio's)

समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी 'सत्यनारायण की कथा' असे होते, परंतु त्याच्या शीर्षकावरून झालेल्या वादामुळे त्याचे नाव 'सत्यप्रेम की कथा' असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन 'आशिकी 3', 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे. तर, कियारा अडवाणी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाव्यतिरिक्त 'गेम चेंजर' चित्रपटात दिसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2023 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).