Thalapathy Vijay Announces Political Party: दाक्षिणात्य अभिनेता थलापथी विजयने ठेवलं राजकारणात पाऊल; Tamilaga Vettri Kazhagam पक्षाची केली घोषणा
'तमिझगा वेत्री कळघम' असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. थलापथी विजयने सांगितले की, त्यांच्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे. तसेच त्यांचा पक्ष 2026 ची विधानसभा निवडणूक लढवेल.
Thalapathy Vijay Announces Political Party: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापथी विजय (Thalapathy Vijay) ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) राजकारणात प्रवेश केला आहे. थलापथी विजय यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाची घोषणा केली. 'तमिझगा वेत्री कळघम' असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. थलापथी विजयने सांगितले की, त्यांच्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे. तसेच त्यांचा पक्ष 2026 ची विधानसभा निवडणूक लढवेल. गेल्या आठवड्यात चेन्नई येथे झालेल्या बैठकीत त्याच्या फॅन क्लब विजय मक्कल इयक्कमने राजकीय पक्षाच्या स्थापनेला होकार दिल्यानंतर अभिनेत्याने ही मोठी घोषणा केली.
अभिनेत्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आम्ही आज आमचा पक्ष 'तमिझगा वेत्री कळघम' नोंदणी करण्यासाठी EC कडे अर्ज करत आहोत. आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवणे, आणि जिंकणे व मूलभूत राजकीय बदल घडवून आणणे हे आमचे ध्येय आहे. जे लोकांना हवे आहे. (हेही वाचा -Thalapathy Vijay In Jawan: शाहरुखच्या 'जवान'मध्ये साऊथ सुपरस्टार थलापती विजयचा तडका)
राजकारण हे माझ्यासाठी फक्त करिअर नाही. ते एक पवित्र कार्य आहे. त्यासाठी मी खूप दिवसांपासून स्वत:ला तयार करत आहे. राजकारण हा माझ्यासाठी छंद नाही. ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे. मला यामध्ये पूर्णपणे गुंतवून घ्यायचे आहे, असंही विजय यांनी नमूद केलं आहे. (हेही वाचा - Thalapathy Vijay Leo Poster Out: थलापती विजयच्या 'लिओ' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित)
अभिनेत्याच्या राजकीय वाटचालीचे स्पष्टीकरण देताना, निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्याच्या राजकीय वातावरणाची आपणा सर्वांना जाणीव आहे. एकीकडे प्रशासकीय गैरव्यवहार आणि भ्रष्ट राजकीय संस्कृती, आणि एक फूट पाडणारी राजकीय संस्कृती जी आपल्या लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न करते. विशेषत: तामिळनाडूमध्ये प्रत्येकामध्ये मूलभूत राजकीय बदलाची तळमळ दिसून येत आहे. ज्यामुळे एक निस्वार्थी, पारदर्शक, जात-मुक्त, दूरदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि कार्यक्षम प्रशासन होऊ शकेल.
दरम्यान, निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर, पक्ष सार्वजनिक सभा आणि कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखत आहे, जिथे ते आपली धोरणे, तत्त्वे आणि कृती योजना सादर करतील आणि ध्वज आणि पक्ष चिन्ह सादर करतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)