Phangat गाण्याचा टीझर रिलीज; जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा ने केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडिओ

'रुही' ही हॉरर कॉमेडी फिल्म आहे. या चित्रपटाची निर्माती स्त्री चित्रपटाचे निर्माते करत आहेत. रुही चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. आता चित्रपटाचे पहिले गाणे लवकरचं प्रदर्शित होणार आहे.

Phangat गाण्याचा टीझर रिलीज; जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा ने केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडिओ
Phangat song Teaser (PC - Instagram)

‘रुही’ (Roohi) चित्रपटाच्या ‘पनघट’ गाण्याचे (Phangat Song) टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये राजकुमार राव, वरुण शर्मा आणि जान्हवी कपूर डान्स करताना दिसत आहेत. हे गाणे सोमवारी प्रदर्शित होणार आहे. नुकताचं रुही चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. 'रुही' ही हॉरर कॉमेडी फिल्म आहे. या चित्रपटाची निर्माती स्त्री चित्रपटाचे निर्माते करत आहेत. रुही चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. आता चित्रपटाचे पहिले गाणे लवकरचं प्रदर्शित होणार आहे. 'पनघट' गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात जान्हवी कपूरने रेड कलरचा लेहंगा घातला आहे.

याशिवाय राजकुमार राव आणि वरुण शर्मा वराच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यांच्या हातात वरमालादेखील दिसत आहे. यात जान्हवी कपूरची स्टाईल पाहण्यासारखी आहे. हे गाण सोमवार 22 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच 11 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे शीर्षक 'रुही अफसाना' असे होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजन यांनी केले आहे. (वाचा - Sidharth Malhotra ​​आणि Kiara Advani चा 'Shershaah' चित्रपट या दिवशी रिलीज होणार; करण जोहरने पोस्टर शेअर करत दिली माहिती)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

एका निवेदनात दिनेश विजान यांनी सांगितलं आहे की, 'स्त्री' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट महिलांच्या सबलीकरणावर आधारित होता. रुही या चित्रपटाचे चित्रीकरण एका नवीन शैलीत केले गेले आहे. रुही हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट सर्वांनाचं आवडेल. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा हा पहिला चित्रपट आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2021 09:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).