Ramyug Teaser Released: दिग्दर्शक कुणाल कोहलीची वेब सीरिज 'रामयुग' चा टीझर रिलीज; एमएक्स प्लेयरवर पाहता येणार

यात रामायणची कहाणी नव्या स्टाईलमध्ये सांगण्यात येणार आहे. यापूर्वी 'रामयुग' ची घोषणा खास अंदाजात करण्यात आली होती.

Ramyug Teaser Released (PC - Instagram)

Ramyug Teaser Released: 'रामयुग' वेब सीरिजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला बरीच पसंती मिळक आहे. रामयुग वेब सीरिज एमएक्स ओरिजिनल सीरिज वर येणार आहे. यात रामायणची कहाणी नव्या स्टाईलमध्ये सांगण्यात येणार आहे. यापूर्वी 'रामयुग' ची घोषणा खास अंदाजात करण्यात आली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासमवेत हनुमान चालीसा तयार केली गेली होती. जी राहुल शर्मा यांनी सांगितली होती.

यात अमिताभ बच्चन हनुमान चालीसा गात होते. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात हनुमान चालीसा ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील नवी जादू सर्वांना अनुभवायला मिळाली होती. आता कुणाल कोहली दिग्दर्शित वेब सीरिजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर 29 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. टीझरमुळे लोकांमध्ये सीरिजबद्दल प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. (वाचा - बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालदीव्स मधील फोटो शेअर करण्यावर संतापला नवाजुद्दीन सिद्दीकी, म्हणाला, 'थोडी तरी लाज बाळगा')

कुणाल कोहली या वेब सिरीजबद्दल खूप उत्साही आहे. त्यांनी बर्‍याचदा या वेब सीरिजचे कौतुकही केले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये प्रभू श्रीरामांच्या जीवनाविषयी अनेक चित्रपट बनले जात आहेत. यामध्ये प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाचा समावेश आहे. आदिपुरुष चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान आणि कृती सॅनॉन यांची महत्वाची भूमिका आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by kunalkohli (@kunalkohli)

याशिवाय रामसेतु या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातूनही हा चित्रपट प्रेरित आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अयोध्येत करण्यात आले. या चित्रपटात नुशरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. कोरोना संकटामुळे या चित्रपटाचे शुटिंग थांबवण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif