'एक विलन' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये तारा सुतारिया करणार आदित्य रॉय कपूर सोबत रोमान्स

तर बॉलिवूड मधील अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) याच्या सोबत चित्रपटात रोमान्स करताना दिसून येणार आहे.

तारा सुतारिया आणि आदित्य रॉय कपूर (Photo Credits-Twitter)

एक विलन (Ek Villain) चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर बॉलिवूड मधील अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) याच्या सोबत चित्रपटात रोमान्स करताना दिसून येणार आहे. तसेच एक विलनच्या पार्ट 2 मध्ये तारा आणि आदित्य यांच्यासह स्टारकास्ट म्हणून जॉन इब्राहिम आणि दिशा पाटनी सुद्धा झळकणार आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट असणार असून एकता कपूर आणि भुषण कुमार प्रोड्युस करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग जून महिन्यापासून सुरुवात करण्यात येण्याची शक्यता आहे.

जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच दोघे एकत्र एक विलन 2 मधून काम करणार आहेत. यापूर्वी मोहित सुरी यांनी सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्यासोबत एक विलनचे दिग्दर्शन केले होते. त्यावेळी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद देण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटातील प्रेमकहाणी ही उत्कट असणार आहे. तसेच जॉन आणि आदित्य या दोघांना चित्रपटाची कथा ऐकली असून ते यामध्ये काम करण्यासाठी फार उत्सुक आहेत.(Baaghi 3 Box Office Collection: टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या 'बागी 3' सिनेमाची दमदार कमाई; पहिल्याच विकेंडला 50 कोटींचा गल्ला)

तसेच तारा चित्रपटात सिंगरची भुमिका साकारणार आहे. निर्माते एका सिंगरच्या शोधात होतेच त्यामुळे त्यांना तारा ही योग्य असल्याचे वाटले. कारण तारा सुतारिया ही एक उत्तम सिंगर असून तिच्यासाठी चित्रपटातील सिंगरची भुमिका साकारणे कठीण होणार नाही. निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख यापूर्वीच जाहिर केली होती. तर पुढील वर्षात 8 जानेवारी 2021 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहता येणार आहे.