Tandav Controversy: तांडव सीरिजमुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हणत मागितली माफी
अशातच आता सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे.
Tandav Controversy: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याची अॅमेझॉन प्राइमवरील (Amazon Prime) वेबसीरिज 'तांडव' बद्दल सर्वत्र वाद निर्माण झाला आहे. अशातच आता सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, आम्ही वेब सीरिज तांडव बद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर बारकाईने लक्ष देऊन आहोत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत सोमवारी एक बैठकीदरम्यान वेब सीरिच्या विविध पैलू आणि कंन्टेट बद्दल लोकांच्या भावना दुखावल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.(Ram Kadam Aggressive On Tandav Web Series: 'तांडव' वेब सिरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांची घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार)
अली अब्बास जफर यांनी पुढे असे ही म्हटले की,वेब सिरीज तांडव ही एक कल्पित कथा आहे आणि जर तिचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेत काही साम्य असेल तर तो निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, समाज, समुदाय, धर्म किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताच हेतू नव्हता.(Web Series Tandav: 'तांडव' अडचणीत; अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखासह निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल)
Tweet:
दरम्यान, तांडव वेब सीरिज मुळे सैफ अली खान, डिंपल कपाडिया आणि सुनील ग्रोवर यांच्यासह 32 जणांवर विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेब सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांची उपहासात्मक खिल्ली आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.