2.0 सिनेमाला Piracy च्या धोक्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी Twitter वर खास आवाहन !
मद्रास हायकोर्टानं (Madras High Court) 37 इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीला 12 हजार वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.
2.0 Movie Piracy : अभिनेता रजनीकांत (Rajnikant) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा बहुचर्चित सिनेमा 2.0 आज प्रदर्शित झाला आहे. जगभरात रजनीकांतच्या (Rajnikanth Fans) चाहत्यांनी मोठ्या उत्साहाने सिनेमाचं स्वागत केलं आहे. पण यासोबतीनेच 2.0 सिनेमा इंटरनेटवर लीक होण्याची भीती निर्मात्यांकडून व्यक्त होत आहे. आर्थिक नुकसानीसोबतच पायरसीमुळे (Piracy) अनेक कलाकारांच्या मेहनतीवर पाणी फिरवले जाते. 2.0 सिनेमामध्ये अक्षय कुमारने असा साकारला खलनायकी अवतार (Video)
तमिळ रॉकर्स (Tamil Rockers) नावाच्या वेबसाईटवर सिनेमा लीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पायरसीचा (Piracy) धोका टाळण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खास आवाहन केले आहे. याद्वारा 4 वर्ष कठोर मेहनत आणि हजारो टेक्निशियनच्या मदतीने VFX चा अद्भुत अनुभव रसिकांना देण्यासाठी आम्ही झटलो. आता तुम्ही रसिकांनी सिनेमागृहातच जाऊन सिनेमा पहावा. पायरसी किंवा डाऊनलोड करून सिनेमाचा आनंद घेता येणार नाही असे सांगत तुम्हांला पायरेटेड लिंक मिळाल्यास antipiracy@aiplex.com वर शेअर करा आणि तमिळ सिनेमाला वाचवा असं म्हटलं आहे.
2.0 सिनेमाच्या निर्मात्यांनी मद्रास हायकोर्टात पायरसी वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टानं (Madras High Court) 37 इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीला 12 हजार वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. 2.0 साठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे इंटरनेटवर सिनेमा लिंक होणं हे मोठ्या आर्थिक नुकसानीचं ठरणार आहे.