Taimur Ali Khan ने असा घालवला 'विकेंड लॉकडाऊन', #LockdownYoga म्हणत आई करीना कपूरने शेअर केला हा क्युट फोटो
ज्यात तो स्ट्रेचिंग करत आहे. करीनाने तैमुरचा हा फोटो शेअर करुन, "योगा केल्यानंतर तैमुर स्ट्रेचिंग करत आहे" असे करीनाने कॅप्शन दिले आहे. त्याचबरोबर या फोटोला #LockdownYoga असा हॅशटॅग वापरला आहे.
महाराष्ट्रात कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. सर्व लोक घरात राहून लॉकडाऊनला पाठिंबा देत आहे. मात्र करीना आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरने (Taimur Ali Khan) लॉकडाऊनमध्ये चांगला वेळ घालविण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. विकेंड लॉकडाऊनच्या काळात तैमुर ने घरात राहून लोकांना एक वेगळाच संदेश दिला आहे. करीनाने हा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये तैमुर योगा करताना दिसत आहे. ज्यात तो स्ट्रेचिंग करत आहे. करीनाने तैमुरचा हा फोटो शेअर करुन, "योगा केल्यानंतर तैमुर स्ट्रेचिंग करत आहे" असे करीनाने कॅप्शन दिले आहे. त्याचबरोबर या फोटोला #LockdownYoga असा हॅशटॅग वापरला आहे.हेदेखील वाचा- दिवंगत Irrfan Khan ला Filmfare Awards 2021 मध्ये Ayushmann Khurrana द्वारा कवितेतून इमोशन ट्रिब्युट; Babil Khan च्या अश्रूंचा फुटला बांध (Watch Video)
लॉकडाऊनदरम्यान अनेक सेलिब्रिटी आज घरात आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहे. यात स्टारकिड्समध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला तैमुर खूप एन्जॉय करताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी करीना आणि सोहा अली खानने आपली मुले घरातच रंगपंचमी खेळत असल्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये करीनाचा मुलगा तैमुर अली खान (Taimur Ali Khan) आणि सोहा अली खानची (Inaya Ali Khan) मुलगी इनाया खेमू एकत्र घरातील गार्डन परिसरात रंगपंचमीचा आनंद घेताना दिसली.