अभिनेत्री ताहिरा कश्यप हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला बॅकलेस फोटो
हा फोटो शेअर करताना त्याने एक इमोशनल पोस्टही लिहीली आहे.
जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) नुकताच पार पडला. या दिनाचे औचित्य साधत अभिनेत्री ताहिरा कश्यप हिने इन्स्टाग्रामवर(Instagram) एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो बॅकलेस असून, या फोटोच्या माध्यमातून ताहिरा कश्यप हिने कर्करोगाशी दिलेल्या लढ्यातील वेदना व्यक्त केली आहे. ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) हिचा पती आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) यानेही आपल्या पत्नीने पोस्ट केलेला फोटो आपल्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने एक इमोशनल पोस्टही लिहीली आहे.
आयुषमान याने इन्स्टाग्रामवर ताहिरा कश्यप हिचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'पा ले तू ऐसी फतेह, समंदर तेरी प्यास से डरे.' या ओळी तुझ्यासाठी आहेत ताहिरा. तुझ्या जखमाही सुंदर आहेत. तू विजेती आहेस. लाखो, करोडो लोकांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील लढाई जिंकण्यासाठी अशी प्रेरणादाई राहा. जागतिक कर्करोग दिन, अशा प्रकारे आयुषमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (हेही वाचा, कॅन्सर पूर्णपणे बरा करणारे औषधं सापडल्याचा Israeli Company चा दावा)
गेल्याच वर्षी ताहिराला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तिला स्तनांचा कर्करोग झाला होता. आपल्या आजाराचे निदान झाल्यापासून ती नेहमीच त्याबाबत उघडपणे बोलत आली आहे. ताहिराने आपल्या उपचारादरम्यान आपल्या पतीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर आणि पोस्ट करणे कायम ठेवले होते. कर्करोग दिनाचे औचित्य साधतही तिने एक फोटो शेअर केला आणि त्यासोबत लिहिले आहे की, 'आज माझा दिवस आहे. आपणा सर्वांना कर्करोग दिनाच्या शुभेच्छा. मी आशा व्यक्त करते की, आपल्यापैकी प्रत्येकजण हा दिवस साजरा करेन.'