Swara Bhaskar-Fahad Ahmad Marriage: अभिनेत्री स्वरा भास्करने बांधली समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्नगाठ, पहा त्यांची Love Story
स्वरा भास्करने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची आणि फहादची संपूर्ण प्रेमकथा सांगताना दिसत आहे. दोघांनी 6 जानेवारी रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहाची नोंदणी केली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अनेकदा तिच्या राजकीय विचारांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या आयुष्यात 'राजकीय एन्ट्री' झाली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला 6 जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही काळापूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसले नव्हते. पण आता स्वराने जानेवारीत झालेल्या लग्नाची घोषणा केली आहे.
स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. स्वरा भास्करने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची आणि फहादची संपूर्ण प्रेमकथा सांगताना दिसत आहे. दोघांनी 6 जानेवारी रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहाची नोंदणी केली आहे.
व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, 'कधीकधी तुम्ही जे संपूर्ण जगात शोधत असता, ते तुमच्या शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री सापडली आणि नंतर आम्ही एकमेकांना शोधले. फहाद अहमद माझ्या मनात तुझे स्वागत आहे. इथे खूप गोंगाट आहे, पण ते तुझेच आहे.’
फहाद अहमदचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी बहेरी, यूपी येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव झिरार अहमद आहे. फहादने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पदवी आणि एम.फिल पदवी घेतली आहे. त्यानंतरच ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईशी सामाजिक कार्यकर्ता म्हणून जोडला गेला. फहाद अहमद TISS विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून 2017-2018 मध्ये प्रथम प्रकाशझोतात आला होता. (हेही वाचा: सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा आडवाणीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल; वरमाला घातल्यानंतर केलं एकमेकांना किस, पहा व्हिडिओ)
दरम्यान, यापूर्वी स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशू शर्मा डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, 2019 मध्ये या दोघांच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली होती. अभिनेत्री शेवटची 'जहां चार यार' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 16 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला.