Suyash Tilak In Khali Peeli: सुयश टिळक ची बॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री, अनन्या पांंडे व ईशान खट्टर च्या खाली पिली मध्ये साकारतोय विलन (PHOTOS)

सुयश टिळक (Suyash Tilak) आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमात चक्क एका गुंंडाच्या रुपात दिसुन येणार आहे, ईशान खट्टर (Ishaan Khattar) आणि अनन्या पांंडे (Ananya Pandey) यांंचे मुख्य पात्र असलेल्या खाली पिली (Khali Peeli) या सिनेमातुन सुयश बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला जात आहे,

Suyash Tilak In Khali Peeli (Photo Credits: Instagram)

झी मराठीची (Zee Marathi) गाजलेली मालिका का रे दुरावा (Ka Re Durawa) मध्ये जय या अत्यंत साध्या सोज्वळ मुलाची भुमिका साकारलेला सुयश टिळक (Suyash Tilak) आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमात चक्क एका गुंंडाच्या रुपात दिसुन येणार आहे, ईशान खट्टर (Ishaan Khattar) आणि अनन्या पांंडे (Ananya Pandey) यांंचे मुख्य पात्र असलेल्या खाली पिली (Khali Peeli)  या सिनेमातुन सुयश बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला जात आहे, अलिकडेच त्याने आपल्या इंंस्टाग्राम अकाउंट वरुन आपले काही चित्रिकरणाच्या वेळचे फोटो शेअर केले होते, जे पाहुन तरी सुयश ला हा राऊडी लूक सुट होतोय असे म्हणता येईल. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा सुयशने या चित्रपटाविषयी तसेच आपल्या भुमिकेविषयी माहिती देत आपण मन्या नावाच्या गुंंडाची भुमिका साकारत असल्याचे सांंगितले होते. तसेच पहिला सिनेमा आहे मात्र लॉकडाउन मुळे त्याचे प्रदर्शन मोठ्या पडद्यावर होणार नाही याची खंंतही त्याने बोलुन दाखवली.

सुयशने सांंगितल्यानुसार तो कुठल्या तरी मालिकेत काम करत असताना चित्रपटाच्या टीम मधील एकाने त्याला पाहिले होते, लूक आवडल्याने त्यांनी सुयशला ऑडिशनसाठी बोलावलं. तीन ऑडिशन्स आणि लूक टेस्ट दिल्यानंतर त्याच्या वाट्याला ही भुमिका आली, यात सर्वात मोठा टास्क होता भाषेचा. पहिलाच चित्रपट असल्याने हिंंदीचा लहेजा शिकुन सांंभाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागली असेही सुयश म्हणतो. भविष्यात मालिका, सिनेमांंसोबतच वेबसीरीज मध्येही आपले नशीब आजमवण्याचा सुयशचा विचार आहे.(हेही वाचा: Khaali Peeli Teaser: अनन्या पांडे, ईशान खट्टर च्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित! (Watch Video)

सुयश टिळक फोटोज

 

View this post on Instagram

 

@ishaankhatter ख़ाली पीली भिड़ रे ले ना भाई! #khaalipeeli Khaali Peeli on 2nd October 2020 only @zeeplexofficial

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

खाली पिली सिनेमात ईशान खट्टर आणि अनन्या एकत्र दिसुन येणार आहेत या दोघांंचेही सुयश ने भरपुर कौतुक केलेय. ईशान चे तर अभिनयावर प्रचंड प्रेम आहे शिवाय अनन्या अत्यंंत सिंंपल आहे तिचा कुठलाही टॅंट्रम नसायचा असे सुयश सांंगतो.

दरम्यान सुयश सध्या मराठी सिनेसृष्टीत सुद्धा चर्चेत आहे, आज पासुन त्याची नवी मालिका शुभमंंगल ऑनलाईन प्रेक्षकांंच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. यात तो सायली संजीव सोबत पहिल्यांंदाच काम करताना पाहायला मिळणार आहे, सुबोध भावे या मालिकेचा निर्माता आहे.